Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
शिर्डी

अवघे तिन दिवसात झाले ११३ रुग्‍णांची मोफत मोतिबिंदु शस्‍त्रक्रिया .

श्री.साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था शिर्डी, श्री साईनाथ रुग्‍णालय येथील नेत्ररोग विभागात दि.३०/०५/२०२४, दि.३१/०५/२०२४ व दि.०१/०६/२०२४ या ०३ दिवसात ११३ रुग्‍णांवर मोफत मोतिबिंदु शस्‍त्रक्रिया करणेत आली. दि.१२/०५/२०२४ रोजी सकाळी १० ते सांयकाळी ०५ वा.पर्यंत या वेळेत श्री साईनाथ रुग्‍णालयात डोळयाची तपासणी शिबीर आयोजीत केलेले होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

सदर शिबीरामध्‍ये तपासणी शिबीरात ९०० रुग्‍णांपैकी १५० रुग्‍णांना मोतिबिंदु शस्‍त्रक्रिया करणेचा सल्‍ला देणेत आला होता. त्‍यापैकी या शिबीरात मोतिबिंदु शस्‍त्रक्रियेसाठी १२४ रुग्‍ण भरती झालेले होते त्‍यातील ११३ रुग्‍णांचे आतापर्यंत शस्‍त्रक्रिया झालेल्‍या असुन उर्वरीत ११ रुग्‍णांची मोतिबिंदु शस्‍त्रक्रिया करणेत येणार आहे.


सदर शिबीर यशस्‍वी व्‍हावे याकरीता श्री साईनाथ रुग्‍णालयातील नेत्ररोग तज्ञ डॉक्‍टर, डॉ.अजित पाटील, डॉ.अनघा विखे, डॉ.प्राजक्‍ता खर्चे (मुळे) डॉ.सुप्रिया पाटील (तोरकडी) यांनी तसेच श्री साईनाथ रुग्‍णालयातील नेत्ररोग विभागातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

या कामाबद्दल श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी श्री साईनाथ रुग्‍णालयातील नेत्ररोग विभागातील सर्व टीमचे अभिनंदन केले असुन रुग्‍णालयात आलेल्‍या एकही गरजवंत रुग्‍ण मोतिबिंदु शस्‍त्रकिया विना राहणार नाही याची काळजी द्यावी. व बाकीच्‍या विभागांनी सुद्धा अशा प्रकारे शिबीरे राबवुन जास्‍तीत जास्‍त रुग्‍णांना रुग्‍णसेवा द्यावी असे आवाहन केले आहे.

यावेळी मोफत मोतिबिंदु शस्‍त्रक्रिया झालेल्‍या रुग्‍णांनी श्री साईबाबा संस्‍थानचे आभार व्‍यक्‍त केले.
या प्रसंगी उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी, तुकाराम हुलवळे, वैद्यकीय संचालक, डॉ.प्रितम वडगावे, वैद्यकीय अधिक्षक, डॉ.मैथिली पितांबरे, यांचासह रुग्‍णालयातील सर्व कर्मचारी, रुग्‍ण व रुग्‍णांचे नातेवाईक उपस्‍थीत होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button