Letest News
सिब्बलांच्या मागणीने ठाकरेंच्या मनातील ‘धनुष्यबाण’ बाहेर? श्रीकांत शिंदेंचा शिर्डीतून घणाघात! दहीहंडी फोडून पारायण सोहळ्याची सांगता ८ हजार २०० पारायणार्थींचा सहभाग — साईनामाच्या जयघोषाने शिर्डी ... शिर्डीत हरवलेला ‘आयफोन’ साईभक्तेला परत शिर्डी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी साईचरित्र पारायणाची भक्तिमय सांगता आज सायंकाळी शिर्डीत पोथीची भव्य मिरवणूक साईचरणी कोते-गोंदकर परिवाराची श्रद्धेची लाखमोलाची ओंजळ!श्री साईचरित्र पारायण सोहळ्यासाठी दोन्ही परिव... विद्यमान खासदार नीलेश लंके यांचा माजी खासदार सुजय विखेंवर नावानिशी हल्लाबोल ‘डोनाल्ड ट्रम्पला स्वियस... साईभक्तांची लूट थांबवणार कोण? वाहतूक शाखेचे ‘अतिकर्तव्यदक्ष’ अधिकारी येसेकर नामदार विखेंच्या आदेशाची... चिक्की-बिस्किटांच्या नावाखाली गुटखा विक्रीचा आरोप पोलिसांनी तातडीने कारवाई करावी शिर्डीतील गुटखा तस्करीचा सूत्रधार कोण? १२ आरोपींनंतर आता ‘आका’पर्यंत पोलिसांचा तपास पोहोचणार का? गुटख्याच्या काळ्या बाजाराला एलसीबीचा दणका! तिघांना न्यायालयात हजर करताच एक दिवसाची पोलीस कोठडी पुरवठ...
अ.नगरक्राईम

बाभळेश्वर येथे मध्य प्रदेशच्या एका इसमांकडून सुमारे 40 हजार किंमतीचा पाच किलो गांजा जप्त! लोणी पोलिसांची कामगिरी!

शिर्डी ( प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे गांजा बाळगणाऱ्या एका मध्य प्रदेशातील ईसमाला लोणी पोलिसांनी पकडले असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
त्या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

लोणी पोलीस स्टेशनचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ व पोलीस पथक 26 डिसेंबर 20 24 रोजी पावणे दोन वाजेच्या सुमारास बाभळेश्वर येथे सरकारी वाहनामध्ये पेट्रोलिंग करीत असताना बाभळेश्वर येथे सोहेल ऑटो हायटेक सर्विसेस या दुकानासमोर एक इसम आपल्या पाठीवर काळे व आकाशी रंगाची सेक बॅग घेऊन वावरत असताना त्याचा पोलिसांना संशय आल्याने त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्या या बॅगमध्ये पाच किलो वजनाचा सुमारे 40 हजार रुपये किंमतीचा गांजा आढळून आला आहे.

या ईसमाचे नाव साबीर रमजान शेख राहणार हानपूर, मध्य प्रदेश असे असून त्याची चौकशी केली असता सुरुवातीला त्यांने उडवडीची उत्तरे दिले .मात्र नंतर त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्या पिशवीत पाच किलो गांजा आढळून आला आहे‌ हा गांजा पोलिसांनी जप्त करून या आरोपी साबीर रमजान शेख याला ताब्यात घेतले असून अटक केली आहे. त्यास मान.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राहता यांच्या न्यायालयात हजर केले असता

त्याला पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला ,अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्म तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, रंजीत गलांडे, यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, पोलीस हेडकॉन्स्टेबल असीर सय्यद, साईनाथ राशिनकर, सचिन शेवाळे, ,पो का. निलेश सातपुते,काळे आदींसह लोणी पोलीस तपास करीत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button