Letest News
शिर्डीत मटक्याचा सुळसुळाट! टपरीच्या आडोशाला ‘कल्याण’चा डाव पोलिसांचा छापा एक जेरबंद विठ्ठल पवारवर ३३ लाखांच्या आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल! बनावट सह्या करून संस्थेला लाखोंचा गंडा भाविक सेवेत SBIची ‘साईसेवा’ ६९ लाखांचे अत्याधुनिक डिश वॉशिंग मशीन देत जपली सामाजिक बांधिलकी! समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ...
अ.नगरक्राईम

राहाता पोलिसांची मोठी कारवाई-साकुरीतील क्लबवर छापा- रम्मी जुगार खेळताना तिघे रंगेहात ताब्यात

राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपक सरोदे यांनी अवैध व्यवसायांविरोधात धडाकेबाज मोहीम सुरू केली असून त्याअंतर्गत साकुरी येथील हॉटेल आठवण येथे सुरू असलेल्या कथित क्लबवर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत रम्मी जुगार खेळताना तिघांना रंगेहात पकडण्यात आले.
दि. १७ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी साकुरी येथील हॉटेल आठवण येथे धाड टाकली. यावेळी आरोपी दत्तात्रय सूर्यभान भोंगळ (रा. पिंपळस), किशोर विठ्ठल भंगणे (रा. राहाता) आणि संजय दत्तात्रय राऊत (रा. बेलापूर) हे विनापरवाना बेकायदेशीरपणे रम्मी जुगार खेळताना आणि खेळविताना आढळून आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या छाप्यात पोलिसांनी आरोपींकडून ४१ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात रोख रक्कम, जुगारासाठी वापरलेले ५२ पत्ते तसेच १० हजार रुपये किमतीचा व्हिवो कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी राहाता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. १९५/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक दिपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका डी. के. अभंग आणि पोलिस पथकाने सहभाग घेतला. पुढील तपास पोहेका अभंग करीत आहेत.


राहाता शहरात नुकतेच पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक सरोदे यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने जुगार, मटका आणि इतर बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या काही क्लबवर पोलिसांची नजर असून आगामी काळात आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button