Letest News
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतले साई समाधीचे मनोभावे दर्शन शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रेशनचा तांदूळ बोबडे आणि पवार काळ्या बाजारात नेतो! गोर - गरीबांच्या मुखातील  अन्न कसा हिरावून घेतो !! सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साई मंदिरात सापडली ४८ हजारांची सोन्याची अंगठी-कर्तव्य बजावताना सापडली सोन्याची अंगठी लक्ष्मण घोरपडें... राहाता तालुक्यातील एकरूखे येथे सरकारी वकिलाच्या घरी धाडसी दरोडा- १.५१ लाखांचा ऐवज लुटून चार दरोडेखोर... साईबाबांवर हात ठेवून शपथ घ्या- टक्केवारी कोणी मागितली?निलेश लंके यांचा विखेंवर घणाघात मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाटइशारा देऊनही संस्थान-नगरपरिषद सुस्त अखेर साईभक्त महिलेवर कु... पती बेपत्ता म्हणून पत्नीची पोलिसांत तक्रार शोध घेताना समोर आला धक्कादायक प्रकार! पत्नीच्या नावाने रू... पैशांसाठी विवाहितेचा छळ चारित्र्यावर संशय घेत मारहाण‘गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आण नाहीतर जिवंत सो... ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुखपदी बाळासाहेब गाडेकर
राजकीयशिर्डी

“द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद”

श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अंतर्गत द्वारकामाई परिसरातील वाढत्या उकाड्यामुळे साईभक्तांना होत असलेल्या प्रचंड त्रासाबाबत साईबाबांचे समकालीन भक्त परिवारातील वंशज राजेंद्र सुभाषराव कोते पाटील यांनी केलेल्या भावनिक मागणीला अखेर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी तात्काळ कुलर बसविण्याचा निर्णय घेतल्याने साईभक्तांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


द्वारकामाईतील अखंड धुनीची उष्णता, पत्र्याचे छत आणि वाढते तापमान यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या हजारो साईभक्तांना अक्षरशः घामाघूम व्हावे लागत होते. महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दिव्यांग भक्तांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत असल्याने अनेक भक्तांकडून नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर साईबाबांचे निस्सीम भक्त तात्या पाटील कोते व बायजामाई कोते यांच्या वंशातील राजेंद्र कोते पाटील यांनी साईभक्तांच्या वेदना मांडत प्रशासनाला भावनिक साद घातली होती.या मागणीची दखल घेत कार्यकारी अधिकारी यांनी कोणतीही दिरंगाई न करता द्वारकामाई परिसरात कुलर बसवून साईभक्तांना मोठा दिलासा दिला. याबद्दल बोलताना राजेंद्र सुभाषराव कोते पाटील यांनी दैनिक “साई दर्शन”शी संवाद साधताना अत्यंत भावनिक शब्दांत भावना व्यक्त केल्या.


“ही समस्या माझी नव्हती, ती लाखो साईभक्तांची होती. मी फक्त निमित्त मात्र होतो. साईभक्तांना होणारा त्रास प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम मी केले. कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ निर्णय घेत कुलर बसविले, त्यामुळे हजारो भक्तांना दिलासा मिळाला. यासाठी मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो,” असे राजेंद्र कोते पाटील यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी, “साईभक्तांची सेवा हीच खरी साईसेवा आहे, हे कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. साईबाबांनी त्यांना अशीच सद्बुद्धी देवो आणि साईभक्तांच्या सेवेसाठी अधिकाधिक काम करण्याची संधी देवो, हीच साई चरणी प्रार्थना,” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.


दरम्यान, द्वारकामाईत कुलर बसवल्यानंतर अनेक साईभक्तांनीही समाधान व्यक्त करत राजेंद्र कोते पाटील आणि संस्थान प्रशासनाचे आभार मानले. “भक्तांच्या वेदना समजून घेणारे प्रशासनच खरे साईसेवक ठरते,” अशा प्रतिक्रिया भाविकांतून उमटत आहेत.
साईनगरी शिर्डी मध्ये देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भक्तांच्या सुविधेसाठी प्रशासनाने घेतलेला हा निर्णय भाविकांसाठी मोठा दिलासा ठरत असून, “साईसेवा म्हणजेच भक्तसेवा” हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button