Letest News
शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड
अ.नगरक्राईम

राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला

राहाता :
संत आणि क्रांतिकारकांची परंपरा लाभलेल्या राहाता शहराला भूतकाळात ‘चळवळीत गाव’ म्हणून ओळख मिळाली. संत साईबाबा, उपासनी महाराज, संत लक्ष्मण महाराज वाकचौरे, संत सुमंत महाराज, तात्याभाऊ भगत यांची पवित्र भूमी…
पण आज चित्र पूर्ण उलटे झाले आहे.

sai nirman
जाहिरात

राहाता शहराला ज्या वैभवाची परंपरा लाभली होती, ते वैभव राजकीय घराणेशाही, परस्परांचे गट-तट, सत्तेची भूक आणि भ्रष्ट कारभारामुळे रोज ढासळत चालले आहे.


🔥 विकास शून्य – राजकीय संघर्ष मात्र कायम

DN SPORTS

ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून काही ठराविक घराणी सत्ता भोगत आली. परंतु, या दीर्घ सत्ताकाळात शहराचा विकास?—
शून्य.

नागरिकांच्या मूलभूत गरजांवर हीच स्थिती कायम:

आजही पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही

घराघरात स्वच्छ पिण्याचे पाणी नाही

भुयारी गटार प्रकल्प अपूर्ण

kamlakar

डांबरी रस्ते आणि चौकांची कामे कागदावरच

पाणी साठवण तलाव नाही

रिंगरोड दशकांपासून केवळ आश्वासनात

पथदिवे, मॉडेलिंग सुविधा, ई-गव्हर्नन्स योजना—सर्व अपूर्ण

जेष्ठ नागरिक गार्डन, पर्यावरण योजना, जातीवार कल्याण योजना—फोल

धार्मिक व तीर्थक्षेत्र विकास—शून्य प्रगती

शहराच्या वाढत्या लोकसंख्येला अनुरूप वैद्यकीय सुविधा अजूनही उपलब्ध नाहीत.


🔥 नागरिकांचे आर्थिक शोषण — कर वाढ, दंड, ब्युरोक्रसीचा त्रास

निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी नागरिकांना दिले काय?
तर—

२४% करवाढ

त्यावर २% व्याज

त्यावरही दंड!

नागरपरिषदेकडून लेखा परीक्षणात आलेले ताशेरे अजूनही दडवले जात आहेत.
शहर वारंवार खोदले जाते, निधी कुठे जातो याचे पारदर्शक उत्तर कोणी देत नाही.


🔥 निवडणूक आली की टोळी – आमिष – खोटे आश्वासन

निवडणूक तोंडावर आली की पकडलेल्या लोकांना हाताशी धरायचे, आमिष दाखवायचे, गट-तट create करून सत्ता मिळवायची—
हीच जुनाट पद्धत आता नागरिकांनी फाट्यावर मारली आहे, असे वातावरण शहरभर दिसते.


🔥 नागरिकांचा इशारा – “आता झाडू हातात!”

भ्रष्टाचार, अत्याचार आणि ढोंगी विकासाचा शेवट आता करायचा—
असा एल्गार राहाता शहरात उमटताना दिसत आहे.

“दारोदार मतांचा जोगवा मागायचा असेल तर आधी उत्तर द्या—

  • २४% करवाढ का केली?
  • पाणीपुरवठा का नाही?
  • रस्ते वारंवार का खोदले?
  • लेखा परीक्षणातील ताशेरे कोणासाठी?”

असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.


🔥 **राहात्यात आम आदमी पार्टीची जोरदार हाक—

भ्रष्टाचार झाडण्यासाठी ‘झाडू’ तयार!**
राहाता शहराचा विकास योग्य दिशेने नेण्यासाठी आणि भ्रष्टाचार झाडण्यासाठी आम आदमी पार्टीने जनतेसमोर स्पष्ट हाक दिली आहे.

दि. २ डिसेंबर २०२५ रोजी
“झाडू” चिन्हासमोरील बटन दाबा
आणि राहाता शहराच्या परिवर्तनाला सुरुवात करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपचे प्रमुख उमेदवार :

नगराध्यक्ष पद — विधीज्ञ रामनाथ भाऊसाहेब सदाफळ

प्रभाग ८ — डॉ. जयंत दामोधर गायकवाड

प्रभाग ५ — महेश अरविंद भालेराव

प्रभाग ३ — निता अमोल शहा

नागरिकांच्या पाठिंब्याने भ्रष्टाचारमुक्त, स्वच्छ, सुरक्षित आणि सक्षम राहाता उभारण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button