Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
अ.नगरराजकीय

गोविंदा पोलिसांच्या कचाट्यात सापडणार?

अभिनेता गोविंदा मंगळवारी त्याच्याच घरामध्ये स्वत:च्या पिस्तूलमधून गोळी सुटल्याने जखमी झाला. परवाना असलेल्या पिस्तूमधील मिसफायर झाल्यानंतर गोविंदाला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शस्त्रक्रिया करुन गोविंदाला घरी सोडण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही फोन करुन गोविंदाच्या प्रकृतीची चौकशी केली. गोविंदाच्या कुटुंबामध्ये या प्रकरणासंदर्भात संभ्रम दिसून येत आहे. गोविंदाकडे रिवॉलव्हर आहे की पिस्तूल याची कल्पना कुटुंबातील लोकांना नाही अशी माहिती समोर आली आहे.


ज्यावेळेस गोविंदा जखमी झाला तेव्हा त्याची पिस्तूल लोड केलेली होती. गोविंदा त्याच्या बॅगमध्ये ही पिस्तूल ठेवत असताना चुकून गोळी सुटली. बॅगमध्ये पिस्तूल ठेवताना ती खाली पडली आणि ट्रीगर दाबला गेल्याने सुटलेली गोळी गोविंदाच्या पायावर गुडघ्याखाली लागली. समोर आलेल्या माहितीनुसार,

त्याच्या घरी तो वगळता इतर कोणीही हे शस्र वापरत नाही. गोविंदा गोळी लागल्याने जखमी झाल्यावर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या पायावर शस्रक्रिया करुन गोळी बाहेर काढण्यात आली असून सध्या त्याच्या पायाला काही टाके आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button