Letest News
शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे पोलीस ठाण्यातही लिंगपिसाट भोंदू खरातचा माज साक्षीदारांनाच दिली दमदाटी! भोंदू खरातचा जेलमधील मुक्काम वाढला-कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड
क्राईमशिर्डी

शिर्डीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दुधाळ व संदीप गडाख  यांच्यावर लाच लुचपत विभागने दाखल केलेल्या गुन्ह्यात गडाख यांना तब्बल 11 महिन्यांनंतर केली अटक 

शिर्डी : विनयभंगाच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच तडीपारी व एमपीडीए अंतर्गत कारवाई टाळण्यासाठी शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या नावाने दीड लाख रुपये तसेच स्वतः 30 हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदार संदीप गडाख (वय 40) याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने पकडले होते
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील उपअधीक्षक वैशाली पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली होती
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

27 वर्षीय तक्रारदारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात मदत करण्यासाठी निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासाठी हवालदार गडाख याने तक्रारदाराकडे दीड लाख रुपयाची मागणी होती होती तडजोडीअंती 30 हजार रुपये घेण्याची तयारी दर्शवली.

याप्रकरणी तक्रारदाराने दिलेले फिर्यादीनुसार सापळा लावण्यात आला. 26 ऑगस्ट रोजी गडाख याने स्वतः 30 हजार रुपये व पोलीस निरीक्षक दुधाळ यांच्यासाठी एक लाख रुपये घेताना सापळा लावल्याचा अंदाज आल्याने मात्र लाच स्वीकारली नाही.

याप्रकरणी भ्र. प्र.अधि.1988 चे कलम 7अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिकच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधिक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, पोलीस उपअधिक्षक वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शरद हेंबाडे, राजेंद्र गीते, चालक परशुराम जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान गडाख याच्यावर यापूर्वीही लाचखोरीची कारवाई झालेली होती

पोलीस निरीक्षक व गडाख यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने आतापर्यंत त्यांना त्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली नव्हती परवा नगर येथील पथकाने संदीप गडाख यांना अटक करून न्यायालया समोर हजर केले असता त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती काल पोलीस कोठडी संपताच पुन्हा न्यायाल्यात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button