Letest News
“राहता मटन मार्केटमध्ये संतापजनक प्रकार-मेलेल्या बोकडाचे मटन विक्री- दुकानदारावर कारवाईचा बडगा!” दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्याशी भेट-बजरंगबलीची मूर्ती देऊन सत्कार शिर्डी ते पनवेल … फसवणुकीचा खेळ उघड! 50 हजारांच्या झोपडपट्टीत घुसून शिर्डी पोलिसाने केला आरोपीचा ‘गे... “भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा मोठा स्फोट; SIT च्या पहिल्याच पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे!” कल्पना खरातचा अटकपूर्व जामिनासाठी धाव- 10 एप्रिलला राहता न्यायालयात सुनावणी साई दरबारातच हात साफ! गर्दीचा फायदा घेऊन 1.25 लाखांचे दागिने लंपास — भाविकांमध्ये संताप “भोंदूगिरीवर राज्यसभेत आवाज!” — खासदार वाघमारे आक्रमक ‘कॅप्टन’ अशोक खरातवर कडक कारवाईची मागणी भोंदू साम्राज्य PART-2 : “समता”चा स्फोट आजच? — जिल्ह्याची नजर SIT प्रमुखांवर खिळली! राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांचे शिर्डीत साईदर्शन-संस्थानकडून भव्य सत्कार “देवाचा दरबार की नराधमाचा अड्डा?” — भोंदू अशोक खरातचा विकृत चेहरा उघडा-काळ्या साम्राज्याची थरकाप उडव...
शिर्डी

श्री साईबाबा संस्थानचे नूतन शैक्षणिक संकुलाचे स्थलांतर कार्यक्रम संपन्न

श्री साईबाबा संस्‍थान निर्मित नवीन शैक्षणिक संकुलात श्री साईबाबा कनिष्‍ठ व श्री साईबाबा वरिष्‍ठ महाविद्यालय स्‍थलांतर शुभारंभ कार्यक्रम संपन्‍न झाले असल्‍याबाबतची माहीती श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


गुरुवार दि. ०४ जुलै २०२४ रोजी सकाळी १०.०० वा या संकुलात श्री साईबाबा कनिष्‍ठ व वरिष्‍ठ महाविद्यालयांचे स्‍थलांतर शुभारंभ कार्यक्रम श्री साईबाबा संस्‍थानचे अध्‍यक्ष तथा प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश सुधाकर यार्लगड्डा यांचे हस्‍ते व श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे प्रमुख उपस्थित संपन्‍न झाला. याप्रसंगी उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, विश्‍वनाथ बजाज, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, प्र.उपकार्यकारी अभियंता दिनकर देसाई, संजय जोरी, प्राचार्य संतोष औताडे, गंगाधर वरघुडे, आसिफ तांबोळी, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी तसेच संस्‍थान कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍थेच्‍या माध्‍यमातून शिर्डी व परिसरातील गरीब विद्यार्थ्‍यांना अल्‍पदरात शिक्षण दिले जाते.

या विद्यार्थ्‍यांना उच्‍च प्रतीचे शिक्षण देणेच्‍या उद्देशाने संस्‍थानने नवीन शैक्षणिक संकुलाची निर्मिती करणे कामी निमगांव-को-हाळे हद्दीतील गट नं.१८३ मध्‍ये १३.५ एकर जागेत या संकुलाचे भूमीपुजन शताब्‍दी वर्षांत भारताचे पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी यांचे हस्‍ते १९ ऑक्‍टोंबर २०१८ रोजी करणेत आले होते. यासाठी २६७ कोटी रुपये खर्च आलेला असून यामध्‍ये इंग्लिश मेडीयम स्‍कुल, कनिष्‍ठ व वरिष्‍ठ महाविद्यालय तसेच कन्‍या विद्या मंदिर यांकरीता स्‍वतंत्र व्‍यवस्‍था करणेत आलेली आहे. प्रत्‍येक इमारतीत डिजीटल क्‍लासरुम, सुसज्‍ज प्रयोगशाळा, आर्ट हॉल, ग्रंथालय, भोजन कक्ष इत्‍यादी सुविधा उपलब्‍ध आहेत. याच बरोबर १०५० आसन क्षमता असलेले ऑडीटोरीयम, जिम, बैडमिंटन हॉल, टेबल टेनिस, कैरम या सारख्‍या खेळांसाठी स्‍वतंत्र व्‍यवस्‍था केलेली आहे.

याचप्रमाणे जलतरण तलाव व इतर खेळांसाठीही मैदान तयार करणेत आलेले आहे.
शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी सदर संकुलाचे आर्किटेक्‍ट डी. ओ. निकम, पुणे यांचे प्रतिनीधी अविनाश बराटे, न्‍याती कन्‍स्‍ट्रक्‍शनचे ज्ञानेश्‍वर डोमे, शानदार इंटेरियर प्रा. लि. चे गौरव नागावकर, श्री ग्रुप ऑफ इंडस्‍ट्रीजचे अविनाश कुदळे व श्री साईबाबा संस्‍थानचे कनिष्‍ठ अभियंता श्री गणेश कोराटे यांचा मान्‍यवरांचे हस्‍ते सत्‍कार करणेत आला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक उपकार्यकारी अभियंता दिनकर देसाई यांनी केले तर प्राचार्य गंगाधर वरघुडे यांनी आभार प्रदर्शन केले व प्रा. डॉ. सोनाली हरदास यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button