अत्याधुनिक दर्शनरांग – आरामशीर व्यवस्था
श्री साईबाबा समाधी मंदिरात भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून नवीन चार हॉल असलेली वातानुकुलीत दर्शनरांग उभारण्यात आली आहे. भाविकांसाठी आरामदायक बसण्याची सोय असून, पेड दर्शन पासही विना शिफारशी उपलब्ध आहेत.
२. शिर्डी ग्रामस्थांसाठी मोफत दर्शन
शिर्डी ग्रामस्थांना गेट नं. ३ वर आधारकार्डच्या आधारे मोफत दर्शन दिले जाते. लग्नानंतर बाहेरगावी गेलेल्या मुली किंवा नोकरीसाठी स्थलांतरित झालेल्या रहिवाशांना देखील ही सुविधा लागू आहे.
३. बोगस आधारकार्डचा गैरवापर
काही परप्रांतीयांनी पैसे देऊन बनवलेले बोगस आधारकार्ड दाखवून स्वतःला शिर्डी ग्रामस्थ म्हणून सादर केले आहे. सकाळच्या काकड आरतीनंतर “शिर्डी माझे पंढरपूर” आरतीच्या वेळी खरे ग्रामस्थ कमी व बोगस ग्रामस्थ जास्त असल्याचे चित्र दिसत आहे. अंदाजे २,५०० पेक्षा जास्त बोगस आधारकार्ड सध्या वापरात आहेत.
४. सुरक्षा आणि सुधारणा यंत्रणा
साई संस्थान प्रशासनाला सुज्ञ नागरिकांकडून आग्रह आहे की, आधारकार्डऐवजी मतदानकार्ड ओळखपत्र सक्तीचे करावे. तसेच पेड पास व स्लॉट दर्शन याबाबतची माहितीचे फलक भक्तनिवास, आश्रम, मंदिर परिसर, रेल्वे स्टेशन, बसस्टॅण्ड व एअरपोर्ट येथे लावावेत, ज्यामुळे भक्तांची गैरसोय टाळली जाईल आणि सुरक्षा यंत्रणा सुलभ होईल.