Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
राजकीयशिर्डी

साई रामनवमी उत्सव २०२६ (वर्ष ११५ वे) : नियोजनासाठी महत्वाची बैठक

साईनगरीत दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या साई रामनवमी उत्सव २०२६ (वर्ष ११५ वे) निमित्त महत्वाची नियोजन बैठक जाहीर करण्यात आली आहे. समस्त शिर्डी ग्रामस्थ व श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने ही बैठक आयोजित करण्यात येत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


🗓 रविवार, दि. १ मार्च २०२६
🕚 सकाळी ११:०० वा.
📍 स्थळ – हॉटेल द्वारका पार्क, नांदुख रोड, शिर्डी
उत्सवाचे नियोजन, विविध धार्मिक कार्यक्रमांची आखणी, पालखी सोहळा, कीर्तन, भजन, ध्वजारोहण, प्रसाद व्यवस्था, वाहतूक व सुरक्षा नियोजन यासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. उत्सवाचे यंदाचे वर्ष ११५ वे असल्याने अधिक भव्य आणि शिस्तबद्ध आयोजनावर भर दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.


ऐतिहासिक परंपरेचा उत्सव
साई रामनवमी हा शिर्डीतील अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक उत्सव मानला जातो. साईबाबा यांच्या काळापासून सुरू झालेली ही परंपरा आजही अखंड सुरू आहे. देश-विदेशातून लाखो भाविक या काळात शिर्डीत दाखल होतात. रामजन्मोत्सव, नामसप्ताह, पालखी मिरवणूक आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण साईनगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघते.


दरम्यान, यंदाच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदासाठी स्थानिक शिर्डी ग्रामस्थ संजय भागवत शिंदे यांची निवड करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ शिर्डीचे दिगंबर कोते यांनी केली आहे. “स्थानिक ग्रामस्थांना संधी दिल्यास उत्सव अधिक लोकसहभागातून आणि पारदर्शकतेने पार पडेल,” असे त्यांचे मत आहे.


ग्रामस्थांना उपस्थितीचे आवाहन
उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. दिपक सोपानराव वारूळे यांनी सर्व ग्रामस्थ, सामाजिक संघटना, व्यापारी, स्वयंसेवक आणि साईभक्तांनी या महत्वाच्या बैठकीस उपस्थित राहून आपले मत मांडावे, असे आवाहन केले आहे. उत्सवाचे नियोजन हे सर्वांच्या सहभागातूनच यशस्वी होते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


साईनगरीतील या ऐतिहासिक रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण शिर्डीकरांचे लक्ष लागले असून, येत्या काही दिवसांत उत्सवाची रूपरेषा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
॥ साई राम ॥

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button