
शिर्डी (प्रतिनिधी) :-
काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शिर्डी व राहाता परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक शेतजमिनी, रस्ते, ओढा-नाल्या यांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांसाठी तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून केली आहे.
आज डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी परिसरातील प्रभावित भागांची सविस्तर पहाणी केली. राहाता शिर्डी व परिसरातील ओढा-नाल्यांची पाहणी करत त्यांनी अत्यंत मुसळधार पावसामुळे नागरिकांना होणाऱ्या अडचणींचा अंदाज घेतला. यावेळी शिवाजी आनप, अनिलभाऊ पिपाडा, नेमीचंद लोढा, महावीर पिपाडा आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
डॉ. पिपाडा यांनी राहाता शहरील छत्रपती व्यापारी संकुल, राहाता साकुरीला जोडणारा पूल, रांजणगाव रोड साई कॉलनी आणि राष्ट्रीय महामार्गलगत शिरकांडे ओढा येथे पाहणी करून परिस्थितीची नोंद घेतली. त्यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन केले.
डॉ. राजेंद्र पिपाडा हे राहाता तालुक्यासाठी नेहमीच लढा देणारे व्यक्तिमत्व आहेत. सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे काम करणारे, हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे.
पावसामुळे प्रभावित नागरिकांच्या मदतीसाठी त्यांनी तत्परतेने प्रशासनाशी संपर्क साधला आणि तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न केले.
स्थानिक नागरिकांनीही या सेवेला उच्च प्रतिसाद दिला असून, प्रशासनाकडे मदतीसाठी संपर्क साधला आहे. अनेकांचे घर पावसाने नुकसान झाले, रस्ते वाहून गेले, तर शेतजमिनी पाण्यात बुडाल्या आहेत. यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची गरज अधोरेखित होत आहे. डॉ. राजेंद्र पिपाडा