Letest News
साईनगरीत दलालांविरुद्ध ‘ऑपरेशन क्लीन कॉरिडॉर’ प्रशासनाचा लोखंडी हात-थेट गुन्हे दाखल! “रडू नका… उत्सवाने निरोप द्या!” — राधा काकूंचा मृत्यूलाही हरवणारा सकारात्मक संदेश संगमनेर तहसील कार्यालयात एसीबीचा सापळा- महसूल सहाय्यक १० हजारांच्या लाचेसह रंगेहाथ पकडला! गजर भक्तीचा.. साई हरी नामाचा ५३ वा सार्वजनिक कीर्तन सोहळा उत्साहात! खग्रास चंद्रग्रहणामुळे ३ मार्च रोजी शिर्डीत दर्शन व्यवस्था तात्पुरती बंद साई रामनवमी उत्सव २०२६ (वर्ष ११५ वे) : नियोजनासाठी महत्वाची बैठक shirdinews-10 मार्चला 101 घरांवर कारवाई लक्ष्मीनगरमध्ये तणावपूर्ण शांतता मध्यरात्री श्री सुमतीनाथ जैन मंदिर येथे दरोड्याचा थरार-अंगरक्षकाच्या धाडसाने कट उधळला श्रद्धा, सबुरी आणि शस्त्रकौशल्याचा चमत्कार! श्री साईबाबा हॉस्पिटल मध्ये ४ किलोचा ट्यूमर यशस्वीरीत्या... दत्तनगर जवळ ‘सोरट’ जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा चौघे जेरबंद
राजकीयशिर्डी

“रडू नका… उत्सवाने निरोप द्या!” — राधा काकूंचा मृत्यूलाही हरवणारा सकारात्मक संदेश

शिर्डी (ता. राहाता) — आयुष्यभर चंदनापरी स्वतः झिजत कुटुंबाला सुगंध देणाऱ्या स्वर्गीय के. राधाबाई गणपतराव पा. कोते यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शनिवार, दि. 28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता सम्राट लॉन्स, पिंपळवाडी रोड, शिर्डी येथे भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


“चंदनापरी देह झिजविला, कष्टातून वसंत बहरला नाही…” या ओळी आज प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणतात. आयुष्यभर कष्ट, त्याग आणि मायेची सावली देत त्यांनी संसाराचा वटवृक्ष फुलवला. स्वतःच्या वेदना मनात ठेवून मुलाबाळांच्या आनंदातच त्यांनी खरा स्वर्ग पाहिला.


मृत्यूपूर्वीचा संदेश… आणि दु:खाला दिलेला नवा अर्थ
देहत्यागाच्या अवघ्या दोन दिवस आधी त्यांनी शांत स्वरात कुटुंबीयांना सांगितले —
“मी गेल्यावर कोणीही रडू नये… माझी अंत्ययात्रा वाजत-गाजत काढा. रस्त्यांवर रांगोळी काढा, फटाके वाजवा… माझा निरोप उत्सवासारखा द्या.”


मृत्यूला सुद्धा त्यांनी भीती नव्हे, तर स्वीकाराची आणि आनंदाची किनार दिली. आणि खरोखरच… अश्रूंना आवर घालत, हृदय पिळवटून टाकणाऱ्या क्षणीही कुटुंबीयांनी त्यांच्या इच्छेचा मान राखला.
वाद्यांच्या निनादात, रांगोळ्यांच्या रंगांत आणि फटाक्यांच्या उजेडात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. दु:खाचा तो क्षणही त्यांच्या शिकवणीप्रमाणे आशेचा आणि सकारात्मकतेचा संदेश देऊन गेला.


मायेची अखंड सावली
त्यांच्या जाण्याने घरातील दिवा विझला असला, तरी त्यांनी दिलेली संस्कारांची ज्योत आजही तेजाने पेटलेली आहे.राधा काकू या शिर्डीच्या पावन भूमीतील साईभक्त परंपरेतील मानकरी होत्या. त्या साईभक्त बायजामाता व तात्या पाटील कोते यांच्या पवित्र वंशपरंपरेतील होत्या. श्रद्धा, सबुरी, सेवा आणि साईनामाचा जप हा त्यांचा श्वास होता.
त्यांच्या आठवणी प्रत्येक क्षणी साथ देतात — स्वयंपाकघरातील सुवासात, अंगणातील शांततेत, नातवंडांच्या हसण्यात… सर्वत्र त्यांचीच छाया जाणवते.


“अनंत तुमची माया, नित्य असुद्या आम्हावरी अखंड तुमची छाया…” — हीच कुटुंबीयांची प्रार्थना.
अध्यात्मिक वातावरणात स्मृतींना अभिवादन
या पुण्यस्मरण प्रसंगी ह.भ.प. बाळकृष्ण महाराज सुरासे (वारी-शिंगवे) यांचे सकाळी 10 वाजता प्रवचन होणार असून, त्यांच्या विचारांतून जीवनाचा खरा अर्थ आणि स्वीकाराची शिकवण लाभणार आहे.
कुटुंबीयांचे नम्र आवाहन

शोकाकूल

श्री. सुभाष गणपतराव पा. कोते
श्री. बाबुराव गणपतराव पा. कोते
श्री. सर्जेराव अशोकराव पा. कोते
श्री. राजेंद्र सुभाषराव पा. कोते
श्री. सुशांत बाबुराव पा. कोते
श्री. वैभव बाबुराव पा. कोते
सौ. विमल सुदामराव पा. वल्टे श्रीमती. शोभा शामराव पा. आहेर
सौ. उषाताई विश्वनाथ पा. पवार
सौ. सरला अर्जुनराव पा. औताडे श्री. बाबासाहेब शिवाजीराव
श्री. रविंद्र शिवाजीराव पा. कोते
पा. श्री. विजय शिवाजीराव कोते
श्री. मिलींद मुकुंदराव पा. कोते
श्री. निलेश मुकुंदराव पा. कोते पा.
श्री. अजित प्रकाशराव पा. कोते
श्री. बिपीन दिलीपराव पा. कोते
श्री. संदिप रविंद्र पा. कोते
श्री. पारेश्वर बाबासाहेब पा.

समस्त कोते पाटील परिवार, शिर्डी यांनी सर्व आप्तेष्ट, मित्रपरिवार व हितचिंतकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
कुठल्याही प्रकारचा दुखवटा स्वीकारला जाणार नाही — कारण त्यांनीच शिकवले, “जीवन हा उत्सव आहे.”
स्व. राधाबाईंचे आयुष्य म्हणजे त्याग, प्रेम आणि स्वीकार यांचे जिवंत उदाहरण.
त्या शरीररूपाने दूर गेल्या असल्या, तरी त्यांच्या मायेची सावली आजही प्रत्येकाच्या हृदयावर आहे… आणि कायम राहील.
विनम्र अभिवादन… कोटी कोटी प्रणाम.
— शब्दांकन : सर्जेराव कोते पाटील

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button