
मंगळवारी महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला असून शिर्डी येथील साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कूल च्या सर्वच विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेत लावला शंभर टक्के निकाल विशेष म्हणजे शेवटच्या विद्यार्थ्यालाही 60% च्या पुढे मार्क्स आहेत, पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यास 94.20 टक्के मार्क मिळाले असून 90 च्या पुढे 4 विद्यार्थी आहेत..

शिर्डीतील गरिबांची इंग्लिश मीडियम शाळा म्हणून श्री विजयराव कोते यांची साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कूलकडे सर्व पालक विद्यार्थी यांचा बघण्याचा दृष्टिकोन होता परंतु आता या शाळेकडे गरिबांची दर्जेदार व उत्कृष्ट शाळा म्हणून विद्यार्थी व पालकांच्या पसंतीला उतरेल यात शंका नाही..
दहावीच्या या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप डांगे सर व श्री गणेश डांगे सर तसेच स्कूल मधील सर्व शिक्षकांनी अपार कष्ट घेत मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत या विद्यार्थ्यांनी स्वतः मेहनत घेत जे आज यश मिळवले आहे त्यात सिंहाचा वाटा या सर्व शिक्षकांचा आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे.
सर्व शिक्षकांचे मनापासून अभिनंदन व आभार पालक वर्गा कडून मानले जात आहे.
श्री साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कुलच्या इयत्ता 10 वी (SSC) सलग तिसऱ्या बॅचचा निकाल 100%*
श्री साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कूल च्या 10 वी सण 2024-25 च्या सलग तिसऱ्या बॅचचा निकाल 100% व उत्कृष्ट लागला असून गुणवत्ता पूर्ण शिक्षणावर शिक्का मोर्तब केला आहे.
प्रथम तीन विद्यार्थ्यां खलील प्रमाणे प्रथम क्रमांक*
तनुजा किशोर चौधरी ९४.२०%
द्वितीय क्रमांक*
साईश सुनील आव्हाड ९३.४०%
तृतीय क्रमांक*
अभिनव सचिन निकम – ९३.००%
चौथा क्रमांक*
साईश विजय सोनवणे ९०.४०%
पाचवा क्रमांक*
तनिष्का विनोद वाणी ८७.६०%
या निकालात विशेष बाब म्हणजे
90% च्या पुढे 4 विद्यार्थी*
85% 6 विद्यार्थी*
80 % च्या पुढे 4 विद्यार्थी*
75% च्या पुढे 4 विद्यार्थी*
70 % च्या पुढे 21 विद्यार्थी*
तसेच 33 विद्यार्थी 60% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत चमकदार यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री विजयराव कोते पाटील, उपाध्यक्ष मा. श्री ताराचंद कोते पाटील, सर्व सन्मानिय संचालक,
प्राचार्य श्री. गणेश डांगे सर, मुख्याध्यापक श्री. संदीप डांगे सर मुख्याध्यापक श्री दिलीप चाफेकर सर समन्वयक श्री अरबाज पठाण सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.