Letest News
चिन्नाराव हॉटेल प्रकरणाने शिर्डीत खळबळ आता शिर्डी नगर परिषद कारवाई करणार का? रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा शिर्डीत उत्साहात- महिलांनी सुजय विखे यांच्या हातावर बांधली राखी बनावट नंबरच्या बेवारस दुचाकीचा छडा- साई संस्थानच्या सुरक्षा विभागाने शोधला मूळ मालक महाराष्ट्रात तुकाराम मुंडे… तर तेलंगणात वैभव गायकवाड! अहिल्यानगरच्या भूमिपुत्राच्या धडक कारवाईने गुन... पत्रकारितेतील चार दशकांचा प्रदीर्घ प्रवास- असंख्य पत्रकारांचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख... “राधाकृष्ण विखेंना हटवा…” जरांगेंच्या निर्णायक आंदोलनापूर्वीच मुख्यमंत्र्यांना थेट पत्र! संघर्षाच्या वाटेवरून यशाची पहिली पायरी चढला गौरव लोकचंदानी-बार कौन्सिलची सनद मिळवत वकिलीच्या नव्या प... शिर्डीतील ‘चिन्नाराव’ हॉटेलच्या जेवणात झुरळ? फोटो समोर येताच खळबळ! “विखे पाटलांना काहीच कळत नाही त्यांना फक्त साखर कारखानाच कळतो!” – मनोज जरांगे पाटील तालुक्याला दोन आमदार पण एकही नाही दमदार!रस्त्यांच्या खड्ड्यांनी हैराण कोपरगावकरांचा संताप फलकावर
Blog

कोट्याधीश भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साईंच्या झोळीत कोट्याधीश रुपये अर्पण

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डीतील श्री साईबाबा संस्थान ला मोठ्या संख्येने साईभक्त साई दर्शनासाठी येत असतात व मनोभावे श्रद्धेने देणगी देत असतात. सण उत्सव व सुट्ट्यांच्या काळात संस्थांनला देणगी मिळण्याचे प्रमाणही वाढत असते.
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी येथे दिवाळी सुट्ट्यांमध्‍ये दिनांक १० नोव्‍हेंबर ते दिनांक २० नोव्‍हेंबर २०२३ या कालावधीत संस्‍थानला रुपये १७ कोटी ५० लाख ५६ हजार ०८६ इतकी देणगी प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती साई संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री.पी.शिवा शंकर म्‍हणाले की, दिनांक १० नोव्‍हेंबर ते दिनांक २० नोव्‍हेंबर २०२३ या कालावधीत रुपये १७ कोटी ५० लाख ५६ हजार ०८६ प्राप्‍त झाली आहे. यामध्‍ये रोख स्‍वरुपात रुपये ०७ कोटी २२ लाख ३९ हजार ७९४ दक्षिणा पेटीत प्राप्‍त झाली असून, देणगी काऊंटर ०३ कोटी ९८ लाख १९ हजार ३४८ रुपये, पी.आर.ओ.सशुल्‍क पास देणगी ०२ कोटी ३१ लाख ८५ हजार ६००, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर ०३ कोटी ७० लाख ९४ हजार ४२३, तर सोने ४२५.८१० ग्रॅम रक्‍कम रुपये २२ लाख ६७ हजार १८९ व चांदी ८२११.२०० ग्रॅम रक्‍कम रुपये ०४ लाख, ४९ हजार ७३२ यांचा समावेश आहे.

कोट्याधीश भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साईंच्या झोळीत कोट्याधीश रुपये दिवाळीच्या सुट्यांमध्ये आलेल्या भक्तांनी केले. गर्दीच्या काळात साई संस्थांनने सर्व सुविधा भक्तांना पुरवल्या. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. म्हणून संस्थांनचे अध्यक्ष यार्लागड्डा यांनी सर्व साईभक्तांचे व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button