Letest News
शिर्डीत तरुणावर जीवघेणा हल्ला-तिघे हल्लेखोर फरार मोटारसायकलवरून येत चाकूने वार- दगडांनी मारहाण करत आ... एअरपोर्ट रोडवर रमी जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धाडसी छापा-५ जण रंगेहात पकडले अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष- धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप – तिघांविरुद्ध POCSO गुन्हा साईनगरीत वेषांतर गँगचा पर्दाफाश-ब्लेडने पर्स कापून चोरीचा डाव फसला! शिवरायांच्या आदर्श राज्यकारभाराचा संदेश- डॉ. राजेंद्र पिपाडा यांचे प्रेरणादायी विचार “मोठ्या स्वप्नांच्या उंबरठ्यावर… साईचरणी सोनू सूद”साईबाबाच माझ्यासाठी पद्मश्री!” — सोनू सूद यांची भा... साईभक्तांकडून २० लाखांची अत्याधुनिक रुग्णवाहिका साई संस्थानच्या आरोग्यसेवेला नवे बळ ४१ कोटींचा स्फोट-१४ वर्षांचे लेखापरीक्षण संशयाच्या भोवऱ्यात-सत्य बाहेर काढण्यासाठी विशेष चौकशीची माग... ८.७० लाखांचे सोनं गायब-ज्येष्ठ महिलेची तक्रार-शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-तपासाला वेग शिर्डी शहरात देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
क्राईमशिर्डी

साईबाबा संस्थानच्या गेटसमोरच रिक्षाचालकाचे पाकीट साफ भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरटा फरार

शिर्डी | क्राईम रिपोर्ट –
साईनगरी शिर्डीत चोरट्यांना कोणाचाही धाक उरलेला नाही, हेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. साईबाबा संस्थानच्या गेट नं. 01 जवळील अतिसंवेदनशील मोबाईल काउंटर परिसरात दिवसाढवळ्या पाकीटमारीचा धक्कादायक प्रकार घडला असून, यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
😡 गर्दीचा फायदा, खिशातून पाकीट गायब!
दिनांक 03 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता, संतोष वसंत इंगळे (वय 53, व्यवसाय – रिक्षा चालक, रा. विठ्ठलवाडी, शिर्डी) हे साईबाबा संस्थान परिसरात असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पॅन्टच्या मागील खिशातून पाकीट अलगद लंपास केले. गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्याने काही सेकंदांत हात साफ करून पोबारा केला.
💰 ₹5,400 रोख आणि महत्त्वाचे कागदपत्र चोरीस
चोरीस गेलेल्या पाकिटात
₹5,400/- रोख रक्कम (₹500 व ₹100 च्या नोटा)
ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक MH-17 20100002464
असा महत्त्वाचा व मौल्यवान माल होता.
या घटनेमुळे फिर्यादी आर्थिक अडचणीत सापडला असून, सामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे.
🚔 गुन्हा दाखल; पण चोरटा मोकाटच!
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात BNS 2023 कलम 303(2) अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद दुपारी 1.37 वाजता झाली असली तरी चोरटा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
🎥 सीसीटीव्ही असूनही प्रश्न कायम
संस्थान परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही अशा घटना घडत असल्याने सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तपास अधिकारी पोहेका उदावंत तपास करीत असून, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्याचा शोध सुरू आहे.
⚠️ भाविक व नागरिक संतप्त
“गेटसमोरच चोरी होत असेल तर आत काय?” – नागरिकांचा सवाल
साईबाबा संस्थान परिसरात वारंवार घडणाऱ्या चोरी व पाकीटमारीच्या घटनांमुळे भाविक व स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. “गेटसमोरच सुरक्षितता नसेल, तर भाविकांनी विश्वास कुणावर ठेवायचा?” असा थेट सवाल उपस्थित होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button