Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
क्राईमशिर्डी

रणजीत गलांडे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी पोलिसांची मोठी कामगिरी चेन स्नॅचिंग टोळ्या जेरबंद

शिर्डी शहर व परिसरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या चेन स्नॅचिंग टोळ्यांवर शिर्डी पोलिसांनी मोठा घाव घालत दोन वेगवेगळ्या टोळ्यांतील आरोपींना जेरबंद केले आहे. आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि इतर मुद्देमाल असा सुमारे दोन लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

sai nirman
जाहिरात

दि. २७ जून २०२६ रोजी हॉटेल ऋषिकेश परिसरात एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून चोरटे पसार झाले होते. या घटनेप्रकरणी भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शिर्डी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली.

DN SPORTS

kamlakar

या तपासात सुमित अशोक बोमले, ऋषिकेश पद्मिरे आणि ओमकार शरद भोसले (रा. ता. इगतपुरी, जि. नाशिक) ही टोळी निष्पन्न झाली. यापैकी सुमित बोमले आणि ऋषिकेश पद्मिरे यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या चौकशीत चोरीस गेलेली ४० ग्रॅम १४० मिलीग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हस्तगत करण्यात आली. गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.

याच तपासादरम्यान १५ जून २०२६ रोजी घडलेल्या आणखी एका चेन स्नॅचिंग प्रकरणाचाही उलगडा करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी अनिल सुभाष चिंतामणी याला अटक करण्यात आली असून त्याच्या माहितीवरून प्रकाश गोंदके याचेही नाव समोर आले आहे. या प्रकरणात चोरीस गेलेल्या १२ ग्रॅम सोन्यापैकी ४ ग्रॅम सोने पोलिसांनी हस्तगत केले असून उर्वरित मुद्देमालाचा शोध सुरू आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी सांगितले की, शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत यावर्षी घडलेल्या ९ चेन स्नॅचिंगच्या घटनांपैकी तब्बल ७ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित दोन घटनांचाही लवकरच छडा लावला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे आणि त्यांच्या डीबी पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

या कारवाईमुळे शिर्डी शहरातील चेन स्नॅचर्सचे धाबे दणाणले असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे. तसेच नागरिकांनी आपल्या मौल्यवान दागिन्यांची काळजी घ्यावी आणि कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास तात्काळ शिर्डी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button