Letest News
श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु... बँकेच्या 2.11 कोटींच्या थकबाकीवरून शिर्डीत हॉटेलवर कारवाई-ताबा घेण्यास विरोध-चार महिलांविरुद्ध शिर्ड... साईबाबांच्या चरणी विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे समाधी दर्शनानंतर संस्थानकडून सत्कार "निष्ठावान कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये-भाजप सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे" – विधानपरिषदेचे सभापती प...
राजकीयशिर्डी

“गर्भलिंग चाचणी रॅकेटचे धागेदोरे निफाडपर्यंत १८ आरोपी जेरबंद ६ डॉक्टर अटकेत!”

अहिल्यानगर | प्रतिनिधी

sai nirman
जाहिरात

लोणी पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या अवैध गर्भलिंग निदान चाचणी आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस अधिक धक्कादायक व मोठा होत चालला असून आता या रॅकेटचे धागेदोरे थेट नाशिक जिल्ह्यातील निफाडपर्यंत पोहोचले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आणखी दोन जणांना अटक केली असून आतापर्यंत एकूण १८ आरोपी जेरबंद झाले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये तब्बल ६ डॉक्टरांचा समावेश असल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

सुरुवातीला नेवासा येथील डॉक्टर भणगे, दोन एजंट आणि सहा कुटुंबीयांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि तीन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली होती. मात्र तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसे या काळ्या रॅकेटचे थर उलगडत गेले. ढगे नामक आरोपीकडून आणखी एक सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आले, तर श्रीरामपूर येथील डॉक्टर कुटे आणि डॉक्टर शेख यांनाही अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात अटक करण्यात आली.

DN SPORTS

kamlakar

तपासात पुढे पुणे येथील दोन डॉक्टर आणि मेडिकल साहित्य विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली. हे आरोपी अवैधरित्या सोनोग्राफी मशीन विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वडगाव मावळ येथील मारुती ढोरे यालाही अटक करून त्याच्याकडून वापरातील मशीन जप्त करण्यात आले.

दरम्यान, तपास अधिक खोलात गेल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील दोन जणांची नावे समोर आली. त्यानुसार पोलिसांनी रात्री उशिरा कारवाई करत डॉ. कुणाल प्रभाकर वल्टे आणि सागर शांताराम उल्हाळ यांना ताब्यात घेतले. चौकशीत डॉ. वल्टे यांनी आरोपी ठाकरे याच्याकडून सोनोग्राफी मशीन विकत घेतल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे डॉ. वल्टे हा आधीच अटक असलेल्या डॉ. भणगेचा वर्गमित्र असल्याची माहितीही समोर आली आहे. तर सागर उल्हाळ याच्या ब्लड टेस्टिंग लॅबमध्ये हे मशीन ठेवण्यात आले होते.

दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून एकूण चार पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि तीन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.

या गुन्ह्याचा तपास अतिशय शास्त्रोक्त आणि बारकाईने करण्यात येत असून आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे. अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी भारती आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आठरे पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, “गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपाताचा हा काळाबाजार नेमका किती मोठा आहे?”, “अजून किती बोगस डॉक्टर या रॅकेटमध्ये सामील आहेत?” असे संतप्त सवाल आता समाजातून उपस्थित होऊ लागले आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button