Letest News
दुर्दैवाचा दुहेरी घाव… शिर्डीचा लाडका भूमिपुत्र जितेंद्र शेळके यांच्यासह पत्नी अनुराधाताई यांचीही मृ... शिर्डीचा लाडका भूमिपुत्र हरपला… साई भक्त उद्योजक जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर दुर्दैवी अ... लिंगपिसाट कॅप्टनच्या “पत्नीच्या खात्यातून १७ कोटींचा स्फोट!” – कल्पना खरात रडारवर शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये  “RTO नेही तीच पिपाणी वाजवली – ‘मी नाही त्यातली!’आता ‘कडी लावा आतली’ची माग... पोलीस ठाण्यात ACB चा सापळा – 35 हजारांची लाच घेताना हवालदार रंगेहाथ पकडला! भेसळयुक्त कुल्फीचा भंडाफोड! १८५६ पॅकेट्स जप्त – नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच? ‘भोंदू’ खरात प्रकरणाला नवा टर्न-पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर २२ तारखेला सुनावणी भोंदू खरात प्रकरणात मोठे मासे अडकणार? शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये लोंढेची तासाभरापासून कसून चौकशी सुरू! बोगस खात्यांचा स्फोट- अप्पर पोलीस अधीक्षक वाघचौरे यांचा मोठा खुलासा “चाकणकरांचा स्फोटक आरोप-कोयटे पिता-पुत्रांचा बचाव – खोटं कोणाचं?”
क्राईमशिर्डी

भोंदू खरात प्रकरणात मोठे मासे अडकणार? शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये लोंढेची तासाभरापासून कसून चौकशी सुरू!

शिर्डी : भोंदू अशोक खरात प्रकरण आता अक्षरशः स्फोटक टप्प्यावर पोहोचलं असून शिर्डी पोलिसांनी मोठी चाल खेळली आहे. दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे दीपक लोंढे हे पोलीस ठाण्यात हजर झाले असून गेल्या तासाभरापासून त्यांची जोरदार चौकशी सुरू आहे. या चौकशीमुळे अनेक बड्या नावांचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
🚨 समता पतसंस्थेतील ‘चार खात्यांचा’ बॉम्ब!
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, लोंढे पती-पत्नीच्या नावावर समता पतसंस्थेत तब्बल चार खाते असल्याचे समोर आले आहे. या खात्यांमधून तब्बल 2 कोटींहून अधिक व्यवहार झाल्याची माहिती समोर येताच खळबळ उडाली आहे. हे व्यवहार नेमके कुणासाठी आणि कशासाठी? हा सर्वात मोठा प्रश्न आता उभा राहिला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


⚡ खरात-लोंढे आर्थिक लिंक उघडी!
अशोक खरात आणि कल्पना खरात यांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये दीपक लोंढे यांची भूमिका असल्याचे संकेत पोलिसांना मिळाले आहेत. म्हणजेच हे फक्त एक प्रकरण नसून संपूर्ण आर्थिक साखळी उघड होण्याची शक्यता आहे.
🔥 राजकीय सावल्या गडद – केसरकर कनेक्शन चर्चेत!
दीपक लोंढे हे माजी मंत्री दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय असल्यामुळे या प्रकरणाने आता थेट राजकीय वर्तुळात धडक दिली आहे. विरोधकांकडून आधीच आरोप झालेले असताना, आता पोलिस चौकशीमुळे प्रकरण आणखी तापलं आहे.
💣 दमानिया-आंधारे यांच्या आरोपांना मिळणार पुरावे?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि नेत्या सुष्मा आंधारे यांनी केलेले गंभीर आरोप आता खरे ठरणार का? लोंढे यांच्या चौकशीतून या आरोपांना बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


🚔 ‘मोठे मासे’ अडकणार? पोलिसांची नजर पैशांच्या ट्रेलवर!
शिर्डी पोलीस आता पैशांच्या ट्रेलवर फोकस करत असून, कोण-कोण या व्यवहारात सहभागी आहे याचा शोध घेत आहेत. या चौकशीतून आणखी धक्कादायक नावे बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
👉 जिल्ह्याचं लक्ष एका चौकशीवर!
दीपक लोंढे यांच्या चौकशीतून कोणते मोठे खुलासे होतात, कोणावर कारवाई होते, आणि भोंदू खरात प्रकरण किती खोलवर आहे — याकडे आता सगळ्यांचे डोळे लागले आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button