Letest News
72 तास उलटले… तरी गुन्हा नाही! शिर्डीत धर्मांतर प्रकरण गूढच” “हिंदुत्ववादी संघटना शांत का? शिर्डीत स... दैनिक साई दर्शनचा दणका! ‘मुंबई बिर्याणी’वर कारवाई – हॉटेल सील घरकुल मंजुरीसाठी लाच मागणाऱ्यांवर सापळा- १० हजार घेताना रंगेहात अटक! अनुयायांच्या नावावर बनावट खाती-‘समता पतसंस्था’चा महाघोटाळा उघडकीस? “समता”ला संरक्षण कोण देतंय? शिर्डीत मानपानाच्या नावाखाली नवविवाहितेचा छळ- पतीसह सहा जणांवर गुन्हा! शिर्डीत वैद्यकीय चमत्कार! 15 किलोची प्रचंड गाठ यशस्वीरीत्या काढली थकीत वीजबिलावर ५०% सवलत द्या- डॉ. राजेंद्र पिपाडा यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन जिल्ह्यात बालविवाहाविरोधात प्रशासनाचा धडाका- १५५ प्रकरणांत हस्तक्षेप-वर्षभरात ७ गुन्हे दाखल-अनेक विव... शेळके दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू- हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार सिन्नरचा दीपक लोंढे पोलिसांच्या रडारवर- २५ मालमत्तांची माहिती समोर!
राजकीयशिर्डी

आखाती युद्धाची झळ गॅस पुरवठ्यावर-गॅस कंपन्यांचा मोठा निर्णय-२१ ऐवजी ३१ दिवसांनी बुकिंग

शिर्डी :
आखाती भागात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता देशातील इंधन व गॅस पुरवठा व्यवस्थेवरही दिसून येऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्चे तेल व एलपीजी पुरवठ्यावर निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे गॅस कंपन्यांनी घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरणाबाबत काही कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या असून शिर्डी परिसरातील ग्राहकांमध्ये देखील चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी घरगुती गॅस ग्राहकांना २१ दिवसांनी सिलेंडर बुकिंग करण्याची परवानगी होती.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मात्र नव्या नियमांनुसार ही मुदत ३१ दिवसांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे अचानक गॅस संपल्यास ग्राहकांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक ग्राहकांनी सिलेंडर उपलब्ध होत नसल्याची तक्रार देखील गॅस एजन्सीकडे केली आहे.
यासोबतच गॅस कंपन्यांनी डिजिटल पडताळणीची प्रक्रिया देखील कडक केली आहे. ग्राहकांनी गॅस सिलेंडर बुकिंग करताना आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरूनच बुकिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. बुकिंग केल्यानंतर ग्राहकांच्या मोबाईलवर OTP (वन टाइम पासवर्ड) पाठवला जात असून तो देणे आवश्यक करण्यात आले आहे. या प्रक्रियेविना सिलेंडर वितरण होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.


दरम्यान, गॅस कंपन्यांनी प्रत्येक ग्राहकासाठी वर्षभरात मिळणाऱ्या सिलेंडरचा निश्चित कोटा ठरवलेला आहे. ज्या ग्राहकांचा हा कोटा पूर्ण झाला आहे, त्यांना सध्या चालू मार्च महिन्यात सिलेंडर मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा ग्राहकांना नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतरच म्हणजे एप्रिलपासून सिलेंडर उपलब्ध होणार असल्याचे समजते.
याशिवाय तेल कंपन्यांनी सध्या नवीन अतिरिक्त गॅस सिलेंडरचे वितरण देखील थांबवले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यापूर्वी अनेक ग्राहकांकडे दोन किंवा तीन सिलेंडरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत होती. मात्र सध्याच्या परिस्थितीत पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही सुविधा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

व्यावसायिक गॅस ग्राहकांनाही या निर्णयाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. हॉटेल, खानावळ, केटरिंग व्यवसाय तसेच लहान उद्योगांना गॅस सिलेंडर दरामध्ये काही प्रमाणात सवलत तसेच क्रेडिट सुविधेवर सिलेंडर उपलब्ध करून दिले जात होते. मात्र नव्या नियमावलीनुसार ही सवलत व क्रेडिट सुविधा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गॅस एजन्सींना देखील कंपनीकडून मिळणारी क्रेडिट सुविधा थांबविण्यात आली आहे.
यामुळे गॅस पुरवठा साखळीवर काही प्रमाणात ताण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, परिस्थिती लक्षात घेता ग्राहकांनी संयम बाळगावा आणि गॅसचा वापर गरजेपुरता करावा, असे आवाहन गॅस वितरकांकडून करण्यात आले आहे.
चौकट : गॅस ग्राहकांनी सहकार्य करावे
घरगुती गॅस ग्राहकांनी मोबाईलद्वारे अधिकृत पद्धतीने बुकिंग करून आवश्यकतेनुसार अतिरिक्त सिलेंडर भरून ठेवावे. तसेच गॅससाठी बायोमेट्रिक E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सध्याच्या संभाव्य तुटवड्याच्या काळात ग्राहकांनी गॅसचा वापर बचतीने करावा व गॅस कंपन्यांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
— बबनराव भुसारी पाटील
संचालक, साई गणेश गॅस एजन्सी, शिर्डी

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button