Letest News
श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु... बँकेच्या 2.11 कोटींच्या थकबाकीवरून शिर्डीत हॉटेलवर कारवाई-ताबा घेण्यास विरोध-चार महिलांविरुद्ध शिर्ड... साईबाबांच्या चरणी विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे समाधी दर्शनानंतर संस्थानकडून सत्कार "निष्ठावान कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये-भाजप सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे" – विधानपरिषदेचे सभापती प...
राजकीयशिर्डी

खग्रास चंद्रग्रहणामुळे ३ मार्च रोजी शिर्डीत दर्शन व्यवस्था तात्पुरती बंद

शिर्डी : सोमवार दि. ०३ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट विश्वस्त व्यवस्थेमार्फत दर्शन व्यवस्थेत तात्पुरता बदल जाहीर करण्यात आला आहे.
संस्थान प्रशासनाच्या माहितीनुसार, दुपारी ०३.२० वा. ते सायंकाळी ०६.४८ वा. या कालावधीत श्री साईबाबा समाधी मंदिर तसेच संस्थान अंतर्गत सर्व मंदिरांमध्ये दर्शन व्यवस्था बंद राहणार आहे. या वेळेत मंदिर परिसरात धार्मिक मंत्रोच्चार व विधी सुरू राहतील.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


चंद्रग्रहण संपल्यानंतर सायंकाळी ०७.०० वा. मंगलस्नान, त्यानंतर “शिर्डी माझे पंढरपूर” आरती व धुपारती संपन्न होईल. आरतीनंतर दर्शन व्यवस्था पूर्ववत सुरू करण्यात येईल. रात्री १०.०० वा. नियमित शेजारती होणार असल्याचे संस्थानकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


गोरक्ष गाडीलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी (भा.प्र.से.), यांनी भाविकांनी वरील बदलांची नोंद घ्यावी व संस्थान प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.


खग्रास चंद्रग्रहणाच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल होत असल्याने प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली असून दर्शन वेळांमध्ये झालेल्या या तात्पुरत्या बदलाबाबत भाविकांनी नियोजनपूर्वक दर्शनासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
॥ साई राम ॥

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button