Letest News
"छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष... रस्ता अडवल्याच्या कारणावरून रक्तरंजित हल्ला-बीअरच्या बाटल्यांनी दोघांना केले रक्तबंबाळ ३० दारू धंदे अभयात एकावरच कारवाई-मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशयाची सुई! मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड
क्राईमशिर्डी

रेणुका ट्रॅव्हल्सचा उघड भांडाफोड – प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या मालकावर शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

शिर्डी : बाबांच्या साईनगरीत प्रवाशांची खुलेआम फसवणूक करणाऱ्या रेणुका ट्रॅव्हल्सचा काळा कारनामा अखेर पोलिसांच्या जाळ्यात! बुकींगची रक्कम घेऊन सेवा न देता प्रवाशांची दिशाभूल, खोटी माहिती आणि मानसिक त्रास देणाऱ्या मालक सुनिल चव्हाण (रा. श्रीरामपुर) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 318/4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा नोंद : CR No. 1013/2025

sai nirman
जाहिरात

मुंबईला इंटरव्ह्यूसाठी जाणाऱ्या मुलाचे भविष्य अडवले – गाडी दाखवलीच नाही!

फिर्यादी जितेश मनोहर लोकचंदानी, वय 49, रा. कालीकानगर, शिर्डी, यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार— गौरव हा मुंबई येथील गव्हर्मेंट लॉ कॉलेजला शिक्षण घेत आहे तो २ तारखेला मतदानाच्या निमिताने आला होता त्यास मतदान करून पून्हा त्याच दिवशी मुंबईला जायचे होते 
 गौरव याचा मुंबई येथे महत्वाचा इंटरव्ह्यू होता. त्यासाठी कुटुंबाने रेडबस वरून 630/- रुपये भरून रेणुका ट्रॅव्हल्सचे शिर्डी–मुंबई बुकींग केले.

DN SPORTS

पिकअप वेळ : रात्री 10.45
ठिकाण : साई सिद्धांत हॉटेल, नगर–मनमाड रोड

परंतु—

ठरलेल्या वेळेला गाडी आली नाही किंवा आम्हाला ड्रॉयव्हरचे व ऑफिसचे कुठलेही फोन आले नाही 

आम्ही फोन करून गाडीबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केल्यास ड्रायवर ने फोन उचलले नाही नंतर मालकाला फोन केल्यावर मालकाकडून “गाडी निघाली… सावळीविहीरला या” अशी चुकीची माहिती देण्यात आली 
सावळीविहीरला गेल्यावर गाडीचा पत्ताच नाही नव्हता 

मुलाचे भविष्य ठरवणारा इंटरव्ह्यू हुकला असता  आमच्या कुटुंबाला आर्थिक + मानसिक + शारीरिक त्रास झाहा प्रकार म्हणजे प्रवाशांच्या विश्वासावर केलेला थेट वार असल्याचे फिर्यादींनी स्पष्ट केले.

kamlakar

हा एकच प्रकार नाही – ट्रॅव्हल्सकडून सतत फसवणूक, साई भक्तांवर अन्याय

तपासात समोर आलेली धक्कादायक माहिती—

रेणुका ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हर व मालकाचे अनेक फसवणूक प्रकार केलेली असल्याचे कळाले आहे 
“झंझट नको” म्हणून अनेक साई भक्त तक्रार करत नाहीत याआधी डॉल्फिन ट्रॅव्हल्सवरही गुन्हे
काही ड्रायव्हर–कंडक्टरकडून प्रवाशांना मारहाण
गैरवर्तन, उद्धटपणा आणि मनमानी हेच त्यांचे धंदे
अशा मुजोर लोकांमुळे संपूर्ण ट्रॅव्हल्स व्यवसाय बदनाम होत असल्याचे नागरिकांनी व्यक्त केले आहे.


“गय नाही! प्रत्येक तक्रारीवर कठोर कारवाई” – PI रणजित गलांडे

शिर्डी पोलीस स्टेशनचे निरीक्षक रणजित गलांडे यांनी स्पष्ट इशारा दिला :

“फसवणूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सची गय केली जाणार नाही. कोणताही प्रवासी घाबरू नये. सरळ शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये या — त्वरित गुन्हा दाखल केला जाईल.”

पोलिसांनी या प्रकरणात तपासाची गती वाढवली असून, संबंधित ट्रॅव्हल्सवर कठोर departmental action होण्याची शक्यता आहे.


 फिर्यादी लोकचंदानी यांनी सांगितले—
“अशा ट्रॅव्हल्सना आळा बसावा म्हणून परिवहन मंत्री व संबंधित विभागात कठोर कारवाईसाठी मी पाठपुरावा करणार.”

या गुन्ह्यामुळे—

अश्या मुजोरांचा ट्रॅव्हल्सचा परवाना रद्द व्हावा 

RTO पातळीवर चौकशी व्हावी 

प्रवाशांच्या हितासाठी कडक कारवाईची मागणी

ट्रॅव्हल्सच्या मुजोरीवर थेट लगाम लागावा यासाठी पाठपुरावा करणार 

या कारवाईमुळे भविष्यात प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सना मोठा धाक बसेल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button