शिर्डी प्रतिनिधी आज श्री कृष्ण जन्माष्टमी असल्याने शिर्डी शहरात श्री साईबाबांच्या रथाची मुरवणूक निघत असते आणि शिर्डीतील अनेक कृष्णभक्त दहहंडी निमित्त चौका चौकात दहीहंडी बांधून दहीहंडी फोडून उत्सव साजरा करतात त्यात सर्व समाजातील लोक सामील होऊन दहीहंडीचे आनंद घेत असतात
आजपर्यंत दही हंडीच्या दिवशी कधीही कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नव्हता आज सायंकाळी शहरात अनेक मंडळानी दहीहंडीचे आयोजन केले होते एका बाजूने सर्व आनंद मंगल वातावरण असतांना चार मित्रांमध्ये पूर्वीच्या वैमस्यातून वादविवाद झाले आणि तिघांनीं एका तरुणांवर वार केल्याने तो तरुण मयत झाल्याची घटना घडली आहे
पूर्वीच्या वादविवादातून व नशेच्या धुंदीत ही हत्या केल्याची चर्चा आहे ह्या मुलांनी ज्यावर वार करून ठार मारले तो शिर्डीतील ठाकूर समाजातील सोनूकुमार ठाकूर असल्याचे सूत्रांकडून कळाले आहे
शिर्डी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत चौकशी केली आणि आरोपी साई सुनील कुमावत व शुभम गायकवाड आणि एका अल्पवयीन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहेत