
शिर्डी प्रतिनिधी
काल सायंकाळी नगर मनमाड रोडवर असलेल्या हॉटेल मध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोकांनी हल्ला करून हॉटेलचे नुकसान करीत सोन्याची चैन व रोख रक्कम घेऊन फरार झाल्याची घटना घडली होती त्याची फिर्याद हॉटेल मालक वैभव दिलीप भाटीया याने दिली आहे फिर्यादीत फिर्यादीचे म्हणणे पुढील प्रमाणे……………………………………….

काल दिनांक 06/08/2025 रोजी मी माझ्या हॉटेलवर हजर असताना रात्री 8/30 वाजेचे सुमारास हॉटेलमध्ये ग्राहक आलेले होते टेबलवर ग्राहक जेवणासाठी बसलेले होते. त्यावेळी 1) करण आव्हाड 2) किरण बागुल 3) रोहीत कापसे 4) बंटी घाणे 5) शुभम उर्फ बाळा पवार 6) शेखर साहेबराव कापसे 7) विजय बापु कापसे 8) आमोल बाणाईत 9) विकी मिसर यांनी
हॉटेलवर हल्ला केला यातील करण आव्हाड व त्याचे साथीदार मला म्हणाले की, तुला हॉटेल चालवायचे असेल तर आम्हाला महीन्याला दहा हजार रुपये हफ्ता दयावा लागेल. त्यावर मी त्यांना बोललो की, मी तुम्हाला पैसे का देवु त्यावरुन वरील लोकांनी मला लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरु केली. तु हफ्ता दयायला नाही म्हणतो काय,
असे म्हणुन हॉटेलमधील खुर्थ्यांनी माझ्या डोक्यावर मारले व हफ्त्याचे पैसे दे असे बोलत होते, करण आव्हाड याने सोडयाची बाटली माझ्या डोक्यात मारुन दुखापत केली व गेल्या सहा महीन्याचा हॉटेलचा हफ्ता म्हणुन तुझ्या गळ्यातील सोन्याची चैन दे असे म्हणुन माझे गळ्यातील चैन काढली ती झटापटीत खाली पडली ती किरण बागुल याने उचलुन घेतली व खिशात टाकली.
बाकीचे लोक खुर्याची टेबलाची झाडांचे कुंड्यांची हॉटेलमधील साहीत्याची तोडफोड करुन नुकसान करत होते. त्यावेळी या लोकांची दहशतीमुळे हॉटेलमधील जेवनासाठी आलेले ग्राहक घाबरुन जागा सोडुन सैरावैरा पळाले माझे डोके फोडुन रक्त येत होते मी माझ्या रुमालाने डोक्याचे रक्त दाबुन धरले होते. तेव्हा माझ्या हॉटेल मध्ये असणारे अर्जुन शमी सागर जावळे वायरमन
वॉचमन अब्दुल सय्यद, मॅनेजर निलेश पवार यांनी मला पकडुन धीर दिला व माझा भाउ वैचंत याला बोलावुन घेतले माझा भाउ मला उपचारासाठी श्री साईबाबा हॉस्पीटल शिर्डी येथे घेवुन आला असुन आता माझेवर उपचार सुरु आहे.
वरील गुंड्यांनी (खंडणी) दे नाहीतर हॉटेल चालवु नको, हॉटेल चालु देणार नाही असे म्हणाले त्यावेळी मी त्यांना म्हणाले की, मी का तुम्हाला पैसे खंडणी देवु त्यावरुन वरील लोकांनी मला लाथाबुक्क्यांनी हॉटेलमधील खुर्थ्यांनी मारहाण केली. व खंडणी पोटी माझे गळ्यातील सोन्याची 20 ग्रॅम वजनाची चैन काढुन नेली. तसेच हॉटेलमधील खुच्र्या टेबल व ईतर साहीत्य लॅपटॉप हॉटेल नावाचा बोर्ड झाडांच्या कुंड्या यांची तोडफोड करुन दहशत निर्मान केली.
म्हणून मी वरील लोकांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
शिर्डी पोलीस स्टेशनंने वरील आरोपी विरोधात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्यात 4 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची नावे……………………………………..
- विजय बापू कापसे वय 19 बाजार तळ, शिर्ड
- किरण अशोक बागुल वय 23 निघोज तालुका राहता
- बंटी @ सोमनाथ अनिल घाणे वय 19 सौदडी बाबा चौक, शिर्डी
- शेखर साहेबराव कापसे वय 20 कालिका पार्क, शिर्डी 4 आरोपीन्ना ताब्यात घेतले आहे पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करीत आहेत