
शिर्डीचे येथील ग्राम महसूल अधिकारी सतीश भाऊसाहेब गायके यांना धक्काबुक्की करून मुरूम भरलेला ट्रक दादागिरी करून पळवला ह्याबाबत ग्राम महसूल अधिकारी सतीश गायके यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे त्यात ते म्हटले आहे कि
मी दिनांक 29/07/2025 रोजी सकाळी 10/00 वाजण्याचे सुमारास माझ्या मोटार सायकलवर कार्यालयीन कामानिमित्त वेस-सोयेगांव रांजणगांव रोडने जात असतांना वेस गावांत मारुती मंदीराचे जवळ, रोडवर चौफुलीचे ठिकाणी एक विना नंबरचा पांढ-या व निळसर रंगाचा डंपर हा वेस गावाकडे येत असतांना दिसल्याने त्यास थांबवुन त्याच्याकडे मुरुम वाहतुक करण्याचा परवाना आहे अगर कसे याबाबत विचारणा केली असता
त्याने परवाना नसल्याचे सांगितले व त्यानंतर त्या ठिकाणी लोकं आले त्यापैकी एक इसम आला व मला म्हणाला की मी नितीश बोरुडे असुन हा डंपर माझ्या
मालकीचा आहे.
तु बाजुला हो असे म्हणाला असता मी त्यांना म्हणालो की, सदर डंपर गाडीवर कारवाई करायची आहे गाडीमध्ये चोरीचा मुरुम आहे. तेव्हा नितीश बोरुडे याने माझी शर्टची कॉलर पकडुन हाताने कवळी मारुन धरुन ठेवले त्यावेळी नितीश बोरुडे याने माझा मोबाईल खिशातुन काढुन बाजुला टाकला व ढंपरवरील ड्रायव्हर संतोष अहिरे याने मला धक्काबुक्की केली.
त्यावेळी जमलेल्या इसमांपैकी एक अनोळखी इसमास नितीश बोरुडे याने डंपर चालु करुन घेवुन जाण्यास सांगितले असता तो घेवुन गेला. म्हणुन माझी 1) नितीश बोरुडे पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही 2) ढंपरवरील ड्रायव्हर संतोष अहिरे पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही व 3) ढंपर घेवुन जाणारा अज्ञात इसम नाव व पत्ता माहीत नाही
यांनी संगनमत करुन मी करत असलेले शासकीय कर्तव्य करण्यापासुन धाकाने परावृत्त करुन मला धक्काबुक्की केली व शासनाची परवानगी न घेता मुरुमाची चोरी करुन तो डंपरमधुन वाहतुक करुन घेवुन गेला म्हणून माझी वरील इसमांविरुध्द शासनातर्फे कायदेशिर फिर्याद आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहे