
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी साठी सर्व शिवसेना पदाधिकारी यांनी सज्ज राहावे असे आवाहन शिवसेना पक्षाचे सचिव श्री राम रेपाळे यांनी केले आहे शिर्डी येथे आयोजित शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात श्री रेपाळे बोलत होते . पुढील एक ते दोन महिन्यात राज्यात नगर पालिका,नगरपरिषद,जिल्हा परिषद,पंचायत समिति यांच्या निवडणुका होणार

त्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून श्री राम रेपाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे . स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी मध्ये मित्र पक्षा सोबत युती होईल अथवा होणार नाही परंतु सर्व शिवसेना पदाधिकारी यांनी या निवडणुकीसाठी सज्ज राहिले पाहिजे असे आवाहन श्री रेपाळे यांनी केले आहे
पुढील काही दिवसात काम न करणाऱ्या पदाधिकारी यांना पद मुक्त केले असणार असल्याचे श्री रेपाळे यांनी सांगितले. यावेळी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते यावेळी मा खासदार श्री सदाशिव लोखंडे,आमदार श्री अमोल खतळ,आमदार श्री विठ्ठल राव लंगहे ,श्री अनिल शिंदे,सचिन जाधव,संभाजी कदम,जिल्हाप्रमुख श्री कमलाकर कोते,
नितीन आऊतडे ,महिला आघाडी जिल्हा प्रमुख विमल पुनडे,सुनीता शेळके,वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख जितेंद्र जाधव,युवासेना जिल्हा प्रमुख शुभम वाघ,महेश देशमुख,माजी आमदार भाऊसाहेब कांबळे ,माजी आमदार भानुदास मुरकुटे ,सागर बेग ,राजूभाऊ शेट्ये, मारुती मेगाळ,सुशांत गजे,वाकचौरे,विठ्ठलराव घोरपडे,राहुल गोंदकर,योगेश जगताप,अक्षय जाधव आदी शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते .