Letest News
समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका
अ.नगरशिर्डी

श्रीराम नवमी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे साई संस्थान व ग्रामस्थांच्या वतीने आयोजन! साईनगरी साई नामाने गेली दुमदुमून!

शिर्डी मध्ये श्रीराम नवमी उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे .शिर्डीचे साई संस्थान व ग्रामस्थांच्या वतीने श्रीराम नवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शिर्डीत साईबाबांच्या हयात काळापासून श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.परंपरेनुसार शिर्डी ग्रामस्थाच्या एकोप्याचं दर्शन या ठिकाणी अनुभवयास येत असून श्रीरामनवमी उत्सव कमिटीचे अध्यक्ष दिपक वारुळे यांच्यासह अनेक जेष्ठ ग्रामस्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसाच्या या

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

उस्तवाचे अतिशय सुंदर नियोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर अधारीत रायबा या महानाट्या. बरोबर महाराष्ट्र केसरी या नामांकित पुरस्काराच्या कुस्त्या, तमाशा, लावणी यासंह शिर्डीतील सुगरण महिला भगिनी यांच्या चविष्ठ पदार्थांचे फूड फेस्टिवल व चिमुकल्या लहान मुला मुलींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचही आयोजन उत्सव कमिटीने यावर्षी केलं आहे.

श्री रामनवमी उस्तवाला देश विदेशातून लाखो भाविक येणार असल्याने बाजारपेठाही फुलून गेल्या आहेत. तर अनेक राज्यातून जिल्ह्यातून शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या असून यासर्व पालख्या मधील प्रत्येक भाविकांना कपाळावर चंदनाचा गंध लावून यात्रा कमिटीचे सदस्य सर्व भाविकांचे स्वागत करत आहेत.

उत्सव कमिटीने यावर्षी शिर्डीमधील ग्रामस्थांना एक घर आकरा दशम्या या अनोख्या उपक्रमाचे आवाहन केल्याने शिर्डीत येणारे भाविक हे दुसरे साईबाबाच आहे अशी श्रद्धा मनी ठेऊन त्यांना यारूपाने अन्नदानाचा उपक्रम ठेवला आहे.श्री रामनवमी उस्तवाचे हे 114 वे वर्ष असून हा उत्सव 5 एप्रिल ते 7 एप्रिल तीन दिवस राहणार आहे. भाविकांच्या दर्शन सुविधेसाठी मुख्य दिवशी सोमवार 7 एप्रिल रोजी साईसमाधी मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साई संस्थान प्रशासनाने घेतला आहे.

साई संस्थान व शिर्डी ग्रामस्थ यांच्या उत्कृष्ठ नियोजनाने या उस्तावाला एक मोठे वलयं प्राप्त झाले आहे. हा उत्सव आनंदाने पार पाडण्याचे आवाहन करत या उस्तावात पालख्यांचं स्वागत तसेच तीन दिवसांच्या उपक्रमाची जबाबदारी कमिटीचे अध्यक्ष दिपक वारुळे, कैलास कोते, अभय शेळके गोपीनाथ गोंदकर,, सचिन तांबे, निलेश कोते,

कमलाकर कोते, दत्तात्रय कोते, सचिन शिंदे, ताराचंद कोते, जगन्नाथ गोंदकर, रवी गोंदकर, बाळासाहेब गोंदकर, भरत चांदोरे, सुदाम गोंदकर,, अनिल शेजवळ,अभिषेक भुजबळ, श्री म्हाळसापती ट्रस्ट ( खंडोबा मंदिर) हे चोख नियोजन पार पाडत आहे. शिर्डीत दाखल होत असलेल्या सर्व साई दिंड्या व पदयात्रींचे जोरदार स्वागत होत आहे. साईनगरी साई नामाने दुमदुमून गेली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button