
शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी येथील भूपेंद्र पाटील यांच्या विरोधात बातमी का टाकली, असे म्हणत मोबाईल वरून प्रथम सचिन बडे व नंतर निलेश वाकचौरे यांनी दमबाजी करीत अरेरावीची भाषा वापरली असून भविष्यात त्यांच्यापासून जीवितीला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशा अशायाची फिर्याद पत्रकार जितेश लोकचंदानी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिली आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, शिर्डी येथील पत्रकार जितेश मनोहरलाल लोकचंदानी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की,मी शिर्डी येथील पत्रकार असुन मी दैनिक साईदर्शन हे वृत्तपत्र व युट्युब वृत्तवाहिनी चालवित असतो,दि.01/04/2025 रोजी सायंकाळी 06/00 वा. मी माझे राहते घरी कालिकानगर शिर्डी येथे दैनिक साईदर्शन वृत्तपत्र व ऑनलाईन चॅनल चालवित असतांना मी एक बातमी प्रसारित केली की, शिर्डी मध्ये 500 कोटी रूपये शेअर मार्केट मध्ये गुंतवून व जास्त पैशाचे आमिष दाखवुन शिर्डी येथील भुपेद्र पाटील याने फसवणुक केली आहे. त्यानंतर 06/15 वा. चे सुमारास माझे मोबाईल मोनं. 8329480310. यावर 9923153414 या नंबर वरून फोन आला असता मी त्यास विचारले की, तुमचे काय काम आहे, तुम्ही कोण बोलता, त्यावेळी त्याने सांगितले की, मी सचिन बड़े (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) बोलतो असे सांगुन, तुम्ही टाकलेली बातमी का प्रसारित केली. मी तुमच्याकडे बघुन घेईल. असे म्हणुन त्याने फोन ठेवला, त्यानंतर पुन्हा माझ्या मोबाईल वर नमूद मोबाईल नंबरवर 9766731001 या क्रमांकावरून मला 3 वेळा फोन आला असता मी फोन उचलला नाही. त्यांनतर त्याच मो.नं, 9766731001 वरून माझे व्हाटसप वर मेसेज आला की, मला कॉल कर, सदर मेसेज वाचून मी त्यास कॉल केला असता तिकडुन एका इसमाने फोन उचलला व मला म्हणाला की, मी निलेश वाकचौरे पाटील रा. पिंपळवाडी, हॉटेल केबीएस ग्रँडचा मालक बोलतो, तुम्ही भुपेद्र पाटील संदर्भात बातमी का प्रसारित केली,? असे बोलुन मला दमबाजी करीत आरेतुरेची भाषा वापरली. त्यानंतर मी तो फोन कट केला. व त्यांनतर मला माझ्या मोबाईलवर वेगवेगळ्या नंबरवरून 100 ते 150 लोकांचे फोन येत होते. परंतु मी ते रिसिव्ह नाही केलें. तरी मी भूपेंद्र पाटील यांचे संदर्भात प्रसारित केलेल्या बातमीच्या अनुषंगाने मला मो. क्रं. 9923153414 सचिन बडे (पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही) व मो. क्रं. 9766731001 निलेश वाकचौरे पाटील रा. पिंपळवाडी, हॉटेल केबीएस ग्रँड या दोघांनी माझ्या मो. क्रं. 8329480310. यावर दमबाजी करून आरेतुरेची भाषा वापरली आहे. तरी भविष्यात त्यांचेपासुन माझ्या जिवीतास धोका असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून माझी त्यांचेविरुध्द फिर्याद आहे. अशा आशयाची शिर्डी पोलीस ठाण्यात जितेश लोकचंदानी फिर्याद दाखल केली असून या फिर्यादीनुसार शिर्डी पो.स्टे.ला गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 267/ 2025 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 351 (4 )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अधिक तपास शिर्डीचे पोलीस करत आहेत.