Letest News
शिर्डीच्या अनाधिकृत बियर बार मध्ये मोठी धाडसात लाखाचे मध्यप्रदेशातिल दारू जप्त चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली साई संस्थान कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! दिवाळीनिमित्त शिधा व म... पैशांचा मोह नाही- कर्तव्याशी इमान! साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचे कौतुक पादुका दर्शन सोहळ्यामुळे शिर्डीच्या दसरा-पुण्यतिथी उत्सवाला ग्रहण?अ‍ॅड. गोकुळ ठुबे यांची चौकशीची माग... प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरती सुरू-पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी! दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता! रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याला काळिमा नीच चैतन्य पाटीलच्या कृत्याचा काळा महिमा!! इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली मानसिक छळाचा ससेमिरा; दोघांवर गंभीर गुन्हा! शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत...
क्राईमशिर्डी

शिर्डीच्या अनाधिकृत बियर बार मध्ये मोठी धाडसात लाखाचे मध्यप्रदेशातिल दारू जप्त

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी-पिंपळवाडी मार्गावरील रुई शिवारात अवैध मद्यविक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर भरारी पथकाने थेट हॉटेल न्यू सनराजवर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. मध्यप्रदेश निर्मित तसेच महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या देशी-विदेशी मद्याचा आणि बिअरचा साठा जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान करडोबानगर येथे लपवून ठेवलेला अतिरिक्त मद्यसाठाही हस्तगत करण्यात आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. या कारवाईत एकूण ६ लाख ९९ हजार ७२७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


प्रतिबंधित मद्यसाठ्यावर थेट छापा!
राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २२ ऑक्टोबर रोजी रुई शिवारातील हॉटेल न्यू सनराज येथे भरारी पथकाने छापा टाकला. या कारवाईत विवेक ऊर्फ जयनारायण मिसर (रा. गणेशवाडी, शिर्डी) याच्या ताब्यातून मध्यप्रदेश निर्मित विदेशी मद्य, महाराष्ट्र निर्मित विदेशी मद्य, बिअर आणि देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय एमएच १४ डीएफ ८४०३ क्रमांकाची मारुती सुझुकी इर्टिगा कार आणि अॅपल कंपनीचा मोबाईलही जप्त करण्यात आला.
आरोपीला राहाता न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.


तपासात लपवलेला मद्यसाठाही उघड
या प्रकरणाचा तपास सुरू असताना करडोबानगर (ता. राहाता) येथे लपवून ठेवलेला १ लाख ३२ हजार ८४८ रुपयांचा मध्यप्रदेश निर्मित मद्यसाठा हस्तगत करण्यात आला. या पुढील तपासाच्या अनुषंगाने आरोपीचा भाऊ सचिन जयनारायण मिसर आणि हॉटेलमधील कामगार विलास खंडेराव थोरात यांच्याविरुद्धही महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नामांकित ब्रँडच्या बाटल्यांचा समावेश
या कारवाईत रॉयल स्टॅग, इम्पिरियल ब्ल्यू, आयकॉनिक व्हाइट, ब्लेंडर्स प्राईड, सिग्नेचर, ओकस्मिथ गोल्ड, रॉयल चॅलेंज, मॅकडॉवेल्स, ओल्ड मंक, ब्लॅक बकार्डी, मॅजिक मोमेंट, किंगफिशर, ट्युबॉर्ग, बडवायझर तसेच भिंगरी संत्रा देशी दारू अशा विविध ब्रँडच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.


वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, पुणे विभागाचे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक (अहिल्यानगर-२) ऋषिकेश इंगळे आणि उपअधीक्षक प्रवीणकुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


निरीक्षक एस. एस. हांडे यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक एम. सी. मांडवेकर, सहायक दुय्यम निरीक्षक जी. जी. ठुबे, कर्मचारी विजय पाटोळे, सचिन बटुळे, प्रवीण सागर, ओमकार पालवे, उद्धव काळे, शुभम लवाडे तसेच महिला जवान रत्नमाला काळापहाड, गायत्री ढेपले आणि भक्ती काळे यांनी कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रशांत गायकवाड करीत आहेत.


अवैध मद्यविक्रीविरोधात कारवाई सुरूच राहणार
मद्याची खरेदी केवळ परवानाधारक विक्रेत्यांकडूनच करावी. अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत माहिती मिळाल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर अथवा स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे. अवैध मद्यविक्री, बेकायदा वाहतूक आणि नियमबाह्य व्यवसायांविरोधात सातत्याने कारवाई सुरू राहणार असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.
हॉटेलवरील छाप्यापासून लपवलेल्या साठ्याच्या जप्तीपर्यंत झालेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध मद्यव्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या तपासाची दिशा महत्त्वाची ठरणार आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button