Letest News
दाल में कुछ काला नहीं… पूरी दाल ही काली दिख रही है! दया साई संगम डिलक्स हॉटेलच्या चोरीत कुछ तो गडबड ... वडिलांची प्रकृती गंभीर तरी १५०० भाविकांची जबाबदारी खांद्यावर! ‘मंत्रीपद सेवेचे, गुंडगिरीचे नाही!’ मंत्र्यांनी मुलाला आवर घालावा- डॉ. राजेंद्र पिपाडांचा इशारा साफसफाई करताना सापडले ६.५ ग्रॅमचे सोन्याचे गंठण- साई कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे केले संस्थानकडे जमा!र... ‘गोविंदा रे गोपाळा’च्या गजराने दुमदुमणार शिर्डी साई समाधी मंदिरात दोन दिवस विविध कार्यक्रम रील बनवा… टॅलेंट दाखवा… अन् जिंका तब्बल ५५५५ रुपयांचे प्रथम पारितोषिक!विकास गोंदकर पा. मित्र मंडळ व ... नियोजित शिर्डी-नाशिक रेल्वेमार्गासाठी निमगाव-कोऱ्हाळे परिसरातील जमिनी जाणार शेतकऱ्यांनी वेळीच हरकती ... “मराठ्यांना मूर्खात काढू नका!” जरांगेंचा विखेंवर थेट बॉम्बगोळा—‘सगळ्यात चालबाज डाव तुमचाच दिसतोय!’ स्मशानभूमीच्या पाठीमागे रंगला ‘तिरट’चा डाव शिर्डी पोलिसांची धडक कारवाई ७ जुगारी ताब्यात शिर्डीत नोकरीला असलेल्या डॉक्टरच्या भरधाव फॉर्च्युनरची धडक निष्काळजीपणामुळे दोघांचा मृत्यू!
क्राईमशिर्डी

दाल में कुछ काला नहीं… पूरी दाल ही काली दिख रही है! दया साई संगम डिलक्स हॉटेलच्या चोरीत कुछ तो गडबड है!

शिर्डी : कर्ज थकीत प्रकरणात नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने तब्बल चार वर्षांपूर्वी सील करून ताब्यात घेतलेल्या शिर्डीतील हॉटेल श्री साई संगम डिलक्समध्ये मोठी चोरी आणि तोडफोड झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. हॉटेलच्या पाठीमागील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला असून, तब्बल 28 एसी फोडून त्यातील कॉपर कॉईल काढून नेल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
चोरट्यांनी केवळ काही किरकोळ साहित्यावर हात साफ केला नाही, तर हॉटेलमधील मोठ्या प्रमाणातील वस्तू चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 36 सिलिंग फॅन, 28 एसीमधील कॉपर कॉईल, 36 गिझर, तब्बल 252 पितळी कॉक व मिक्सर, हॉटेलमधील वायरिंग, लाईट, बोर्ड, लाईट ट्यूब, 4 संगणक व मॉनिटर-सीपीयू सेट तसेच लिफ्टमधील इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या सर्व साहित्याची एकूण किंमत सुमारे 2 लाख 1 हजार 600 रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, चोरीच्या या घटनेपेक्षा अधिक गंभीर बाब म्हणजे बँकेच्या ताब्यात असलेल्या आणि सुरक्षा व्यवस्थेखाली असलेल्या सीलबंद हॉटेलमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर तोडफोड व साहित्य चोरीला कसे गेले? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
चार वर्षांपासून बँकेच्या ताब्यात हॉटेल
फिर्यादीतील माहितीनुसार, हॉटेलचे मालक पद्माकर मुरलीधर सोनवणे यांच्याकडील कर्ज थकीत राहिल्याने नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने 23 मार्च 2022 रोजी हॉटेल सील करून 36 खोल्यांतील सामानासह ताब्यात घेतले होते.
हॉटेलची देखरेख व सुरक्षा करण्याची जबाबदारी बँकेने कराराद्वारे एका खासगी सिक्युरिटी कंपनीकडे दिली होती. संबंधित कंपनीकडून मॅनेजर आणि सुपरवायझर यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. बँकेचे अधिकारीही वेळोवेळी हॉटेलच्या परिसराची पाहणी करून सुरक्षारक्षक उपस्थित आहेत की नाही, याची खात्री करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.


11 ऑगस्टला सर्व व्यवस्थित… 17 ऑगस्टला चोरीचा स्फोटक खुलासा!
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, फिर्यादीतील माहितीनुसार 11 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी हॉटेलची बाहेरून पाहणी केली असता सर्व काही व्यवस्थित असल्याचे दिसून आले होते.
मात्र, त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच परिस्थिती पूर्णपणे बदलल्याचे समोर आले.
17 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास सिक्युरिटी कंपनीच्या व्यवस्थापकाने बँक व्यवस्थापनाला फोन करून हॉटेलच्या पाठीमागील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानंतर बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी शिर्डीत दाखल झाले.
हॉटेलमध्ये प्रवेश करून 36 खोल्या, रेस्टॉरंट आणि हॉलची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर साहित्य चोरीला गेल्याचे तसेच अनेक वस्तूंची तोडफोड करून नुकसान केल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


28 एसी फोडणे… हा प्रकार एका क्षणात शक्य आहे का?
या चोरीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 28 एसी फोडून त्यातील कॉपर कॉईल काढून नेल्याचा आरोप. त्यासोबतच गिझर, फॅन, पितळी साहित्य, वायरिंग आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणेही गायब झाल्याचे सांगण्यात आले आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर साहित्य तोडणे, वेगळे करणे आणि बाहेर नेणे ही गंभीर बाब असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची चर्चा सुरू आहे.
सीलबंद हॉटेलमध्ये प्रवेश नेमका कसा झाला? चोरीच्या काळात सुरक्षा रक्षकांची उपस्थिती कुठे होती? एवढे साहित्य हॉटेलच्या बाहेर कसे नेण्यात आले? चोरी एकाच वेळी झाली की अनेक दिवसांमध्ये हा प्रकार घडला? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे अपेक्षित आहे.

‘सीलबंद’ हॉटेलमध्ये मोठी चोरी; सुरक्षेवर प्रश्नांचा भडिमार
बँकेने सील करून ताब्यात घेतलेल्या हॉटेलमध्ये खासगी सुरक्षा व्यवस्थेची नियुक्ती करण्यात आली होती. तरीही हॉटेलचा दरवाजा तोडून मोठ्या प्रमाणावर साहित्य चोरीला गेल्याची तक्रार समोर आल्याने संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
28 एसी फोडणे, 36 गिझर आणि मोठ्या प्रमाणावर पितळी व इलेक्ट्रॉनिक साहित्य गायब होणे हा किरकोळ प्रकार नसल्याने, या संपूर्ण प्रकरणाची प्रत्येक बाजू तपासून सत्य समोर आणावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.
शिर्डी पोलिसांनी या प्रकरणात फिर्याद नोंदवून पुढील तपास सुरू केला असून, चोरट्यांचा शोध आणि चोरीमागील संपूर्ण घटनाक्रम उघड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button