Letest News
शिर्डीत नोकरीला असलेल्या डॉक्टरच्या भरधाव फॉर्च्युनरची धडक निष्काळजीपणामुळे दोघांचा मृत्यू! बिर्याणीत गुटखा सापडला तर हॉटेल सील… मग जेवणात झुरळ सापडूनही चिन्नाराव हॉटेलला अभय का? दोन दिवसांत न... राहाता पोलिसांची वाळूचोरांवर कारवाई १५ लाखांच्या डंपरसह आरोपी ताब्यात पेढ्यांनी दिला धक्का-पॅकिंगवर विश्वास ठेवायचा तरी कसा? डीमार्टमधून घेतलेले पेढे बुरशीयुक्त शिर्डी–अहिल्यानगर रस्त्यावरून राजेंद्र पिपाडा यांचा संताप ‘जनतेने तक्रारी करायच्या नाहीत तर कोण करणा... “साईबाबांची पालखी समोर असताना कुठल्याही संकटाची भीती नाही!” — निस्सीम साईभक्त विजयभाऊ कोते साईनामाच्या जयघोषात अयोध्येत दाखल झाली साईबाबांची पालखी! दीड हजार साईभक्तांनी घेतले रामलल्लाचे दर्शन माजी मंदिर प्रमुखांची दादागिरी? शिर्डीत खळबळ- सुरक्षा कर्मचाऱ्याला धमकी- शिवीगाळ केल्याच्या आरोपावरू... काशीत दुमदुमला ‘साई नामाचा’ जयघोष!साई निर्माण ग्रुपच्या १२ ज्योतिर्लिंग संकल्पपूर्ती यात्रेचे बनारस ... चोरीच्या तयारीत असल्याच्या संशयावरून गणेश दिलीप खरात मुश्ताक शाह व खाटिक ह्या तिघांना पकडले
अ.नगरक्राईम

शिर्डीत नोकरीला असलेल्या डॉक्टरच्या भरधाव फॉर्च्युनरची धडक निष्काळजीपणामुळे दोघांचा मृत्यू!

अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचा आरोप
राहाता : राहाता तालुक्यातील कोहाळे शिवारातील उपाध्ये वस्ती परिसरात भरधाव आणि निष्काळजीपणे चालविलेल्या फॉर्च्युनरने रस्त्याच्या कडेला बंद पडलेल्या टेम्पोजवळ उभ्या असलेल्या कामगारांना जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
फिर्यादीनुसार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता टाटा कंपनीचा ७०९ टेम्पो (एमएच ०४ एफजे २७६३) शिर्डीहून संगमनेरकडे जात असताना उपाध्ये वस्ती, कोहाळे शिवार येथे वाहन खराब झाले. त्यामुळे चालक व कामगार वाहनाची दुरुस्ती करण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबले होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


याचवेळी शिर्डीकडून आलेल्या टोयोटा कंपनीच्या फॉर्च्युनर (एमएच १७ एझेड ४७७९) या वाहनाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात येत टेम्पोच्या पाठीमागे उभ्या असलेल्या कामगारांना जोरदार धडक दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या अपघातात कामगार गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी शिर्डी येथील श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच एका कामगाराचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दुसऱ्या गंभीर जखमी कामगाराला पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते.

डॉक्टर शिर्डीत सेवेत
या भीषण अपघातातील फॉर्च्युनर चालक डॉ. सत्यजित निघुते हे शिर्डी येथे नोकरीला असल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला असून, या दुर्घटनेत दोन जणांना जीव गमवावा लागला आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून निघून गेल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.


दरम्यान, या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, अपघातात अन्य एक जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
फिर्यादीत संबंधित फॉर्च्युनरचा चालक डॉ. सत्यजित निघुते याच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अपघातानंतर जखमींना उपचारासाठी मदत न करता तसेच अपघाताची माहिती न देता चालक वाहन सोडून घटनास्थळावरून निघून गेल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, निष्काळजी आणि भरधाव वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली राहता पोलीस पुढील तपास करीत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button