Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
क्राईमशिर्डी

शिर्डी पोलिसांची बातच न्यारी… कारवाई भारी!विनापरवाना गावठी कट्टा बाळगणाऱ्याला थेट बेड्या

शिर्डी : प्रतिनिधी
शिर्डी पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पुन्हा एकदा बेधडक कारवाई करत देशी बनावटीच्या गावठी कट्ट्यासह २२ वर्षीय तरुणास जेरबंद केले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत आरोपीच्या घरातील कपड्यांच्या बास्केटमधून तब्बल २५ हजार रुपये किमतीचा लोखंडी गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी साहील सुकदेव खंडीझोड (वय २२, रा. वेस, ता. कोपरगाव) याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम, १९५९ अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा क्रमांक ०७६८/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, साहील खंडीझोड याच्याकडे विनापरवाना देशी बनावटीचा गावठी कट्टा आहे. संबंधित तरुणाचा फोटोही पोलिसांना मिळाला होता. या फोटोमध्ये तो काडतूस हातात घेतल्याचे निदर्शनास आले होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दरम्यान, संबंधित तरुण पोलीस ठाण्याच्या परिसरात आल्यानंतर त्याच्याकडे या बाबत चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी अधिक कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपल्याकडे गावठी कट्टा असल्याची कबुली दिली व तो घरात ठेवल्याचे सांगितले.
त्यानंतर पोलीस पथकाने तातडीने वेस, ता. कोपरगाव येथे धाव घेतली. दोन पंचांच्या उपस्थितीत आरोपीच्या घराची पाहणी करण्यात आली. यावेळी आरोपीने घरातील कपड्यांच्या बास्केटमधील कपडे बाजूला करून त्यातून एक देशी बनावटीचा लोखंडी गावठी कट्टा बाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन केला.
पोलिसांनी जप्त केलेल्या कट्ट्याची किंमत सुमारे २५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फोटोमध्ये दिसत असलेल्या काडतुसाबाबत विचारणा केली असता, आरोपीने ते काडतूस शेतात बंदुकीतून फायर करून वापरून पाहिल्याचे सांगितल्याची नोंद पोलिसांच्या फिर्यादीत करण्यात आली आहे.


या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल केवलसिंग हरिसिंग राजपूत यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून साहील खंडीझोड याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम ३, ५, २५, ७ व २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर शिर्डी पोलिसांनी सुरू ठेवलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे.


गोपनीय माहिती ठरली अचूक
काही दिवसांपूर्वी मिळालेल्या गोपनीय माहितीवर पोलिसांनी विश्वास ठेवून आरोपीपर्यंत पोहोचण्याची मोहीम आखली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने अखेर पोलिसांच्या चौकशीत गावठी कट्टा घरात असल्याचे कबूल केले. त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत थेट घरातून कट्टा हस्तगत करण्यात शिर्डी पोलिसांना यश आले.
शिर्डी पोलिसांची ‘बातच न्यारी’!
गुन्हेगारांविरुद्ध कोणतीही तडजोड नाही, असा संदेश देत शिर्डी पोलिसांनी केलेल्या या कारवाईची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. अवैध शस्त्र बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शिर्डी पोलिसांनी दिलेला हा स्पष्ट इशाराच मानला जात आहे.

धडाकेबाज पोलीस पथकाची करावी तेवढी वाहवा कमीच!
सदरची धडाकेबाज कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री. सोमनाथ वाकचौरे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, तसेच श्री. अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष लांडे, पोलीस कॉन्स्टेबल केवलसिंग राजपूत, सुनील दिघे, नामदेव नालेगावकर तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनीता पवार यांनी अत्यंत सतर्कता व तत्परतेने सहभाग घेतला.
गोपनीय माहितीची अचूक दखल घेत अवैध शस्त्र थेट आरोपीच्या घरातून हस्तगत करून त्याला जेरबंद करणाऱ्या शिर्डी पोलिसांच्या या धडाकेबाज पथकाची करावी तेवढी वाहवा कमीच आहे! अशा बेधडक कारवाईमुळे अवैध शस्त्रे बाळगून समाजात दहशत निर्माण करणाऱ्यांना शिर्डी पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला असून, “शिर्डी पोलिसांची बातच न्यारी… कारवाई भारी!” अशीच चर्चा परिसरात रंगली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर काळे हे करीत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button