Letest News
साईनिर्माण परिवार व श्री साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित भव्य तीर्थयात्रेला गुरुवारी उत्साहपूर्ण प... समृद्धीवर दरोडा… मागे गुटखा तस्करांचे ‘कनेक्शन’?राहुरीच्या उद्योजकाला लुटणाऱ्या टोळीतील कुख्यात किरण... नव्या जागेवरून सत्ताधारी-विरोधकांत जोरदार जुंपली! चेअरमन विठ्ठलराव पवारांचा विरोधकांवर घणाघात राहाता शहरात मावा-गुटख्याचा काळाबाजार उघड! स्थानिक गुन्हे शाखेचा छापा-तिघांविरुद्ध गुन्हा-अवैध तंबाख... चिन्नाराव हॉटेल प्रकरणाने शिर्डीत खळबळ आता शिर्डी नगर परिषद कारवाई करणार का? रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा शिर्डीत उत्साहात- महिलांनी सुजय विखे यांच्या हातावर बांधली राखी बनावट नंबरच्या बेवारस दुचाकीचा छडा- साई संस्थानच्या सुरक्षा विभागाने शोधला मूळ मालक महाराष्ट्रात तुकाराम मुंडे… तर तेलंगणात वैभव गायकवाड! अहिल्यानगरच्या भूमिपुत्राच्या धडक कारवाईने गुन... पत्रकारितेतील चार दशकांचा प्रदीर्घ प्रवास- असंख्य पत्रकारांचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख... “राधाकृष्ण विखेंना हटवा…” जरांगेंच्या निर्णायक आंदोलनापूर्वीच मुख्यमंत्र्यांना थेट पत्र!
अ.नगरक्राईम

समृद्धीवर दरोडा… मागे गुटखा तस्करांचे ‘कनेक्शन’?राहुरीच्या उद्योजकाला लुटणाऱ्या टोळीतील कुख्यात किरण गायकवाड जेरबंद

वैजापूर : प्रतिनिधी
देशातील अत्याधुनिक आणि वेगवान महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर वाहनधारकांना लक्ष्य करून दरोडे टाकणाऱ्या टोळीच्या कारवायांनी खळबळ उडविली असतानाच, वैजापूर पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत टोळीतील कुख्यात आरोपी किरण आजिनाथ गायकवाड (वय २५, रा. हिवरसिंगा, ता. शिरूर कासार, जि. बीड) याला अटक केली आहे.
राहुरी येथील उद्योजकाला समृद्धी महामार्गावर अडवून मारहाण करत गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी बळजबरीने हिसकावून नेल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, या दरोडेखोर टोळीचे बीड जिल्ह्यातील गुटखा तस्करीच्या नेटवर्कशी लागेबांधे असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या दिशेनेही पोलीस तपास करीत आहेत. या टोळीतील आठही आरोपींची ओळख निष्पन्न झाल्याची माहिती समोर येत असून, उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


आलिशान वाहनांतून दरोडेखोरीचा थरार!
राहुरी येथील उद्योजक साहिल सतीश सोनवणे (वय २२) यांच्या तक्रारीवरून वैजापूर पोलिसांनी आठ दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सोनवणे यांची सासो इंडस्ट्रीज एलएलपी नावाची कंपनी असून, ते काही दिवसांपूर्वी तीन मित्रांसह टोयोटा फॉर्च्यूनर कारमधून उत्तराखंड येथे देवदर्शनासाठी गेले होते.
२६ ऑगस्ट रोजी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरून परतत असताना, दुपारी सुमारे चारच्या सुमारास हडसपिंपळगाव टोलनाक्याजवळ हा थरारक प्रकार घडला.
सेल्टॉस, क्रेटा आणि एक्सयूव्ही ७०० या आलिशान वाहनांतून आलेल्या दरोडेखोरांनी सोनवणे यांच्या फॉर्च्यूनर कारला अडविले. अचानक झालेल्या या अडवणुकीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दरोडेखोरांनी सोनवणे यांना मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी बळजबरीने काढून घेतली.
‘डॅशकॅममध्ये सर्व रेकॉर्ड होत आहे’… आणि टोळीची धावपळ!
दरोडेखोरांकडून लूट सुरू असताना सोनवणे यांनी आपल्या वाहनातील डॅशकॅममध्ये संपूर्ण प्रकाराचे रेकॉर्डिंग होत असल्याचे आरोपींना सांगितले.


डॅशकॅमच्या रेकॉर्डिंगची माहिती मिळताच दरोडेखोरांमध्ये खळबळ उडाल्याचे सांगण्यात येत आहे. समोर उभी करण्यात आलेली सेल्टॉस कार बाजूला काढल्यानंतर सोनवणे यांनी प्रसंगावधान राखत आपली फॉर्च्यूनर वेगाने पुढे नेली.
या घटनेनंतर दरोडेखोरांच्या या ‘हाय-प्रोफाईल’ टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी वैजापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली.
कुख्यात किरण गायकवाड अखेर पोलिसांच्या जाळ्यात
या प्रकरणातील आरोपी किरण आजिनाथ गायकवाड याला वैजापूर पोलिसांनी शुक्रवारी, २८ ऑगस्ट रोजी रात्री त्याच्या हिवरसिंगा येथील घरातून ताब्यात घेतले.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण गायकवाड याच्याविरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याची आठ ते नऊ जणांची टोळी समृद्धी महामार्ग परिसरात सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय आहे.
मोठ्या गुटखा तस्करांसाठी ही टोळी काम करीत असल्याचा संशय असून, गुटखा तस्करीच्या नेटवर्कमधून या आरोपींचे संबंध नेमके कोणाकोणाशी आहेत, याचा तपासही महत्त्वाचा ठरणार आहे.
अटक केलेल्या किरणला न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांच्या चौकशीतून उलगडणार ‘दरोडेखोरांचे नेटवर्क’?
किरण गायकवाडच्या चौकशीतून आता अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.


दरोडेखोरांच्या टोळीतील इतर सदस्य कोण आहेत?
लुटलेली सोनसाखळी नेमकी कुठे आहे?
दरोड्यासाठी वापरण्यात आलेली आलिशान वाहने कोणाच्या मालकीची आहेत?
वाहनांवर बनावट नंबरप्लेट लावण्यात आल्या होत्या का?
या टोळीचे गुटखा तस्करीच्या रॅकेटशी नेमके काय संबंध आहेत?
या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासातून समोर येणार आहेत.
पोलीस उपअधीक्षक भागवत फुंदे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले असून, उर्वरित सर्व आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे सांगितले आहे.
समृद्धी महामार्गावर ‘गुटखा नेटवर्क’ची छाया?
समृद्धी महामार्गावर आलिशान वाहनांचा वापर करून प्रवाशांना लक्ष्य करण्याची ही पद्धत अत्…

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button