Letest News
विद्यमान खासदार नीलेश लंके यांचा माजी खासदार सुजय विखेंवर नावानिशी हल्लाबोल ‘डोनाल्ड ट्रम्पला स्वियस... साईभक्तांची लूट थांबवणार कोण? वाहतूक शाखेचे ‘अतिकर्तव्यदक्ष’ अधिकारी येसेकर नामदार विखेंच्या आदेशाची... चिक्की-बिस्किटांच्या नावाखाली गुटखा विक्रीचा आरोप पोलिसांनी तातडीने कारवाई करावी शिर्डीतील गुटखा तस्करीचा सूत्रधार कोण? १२ आरोपींनंतर आता ‘आका’पर्यंत पोलिसांचा तपास पोहोचणार का? गुटख्याच्या काळ्या बाजाराला एलसीबीचा दणका! तिघांना न्यायालयात हजर करताच एक दिवसाची पोलीस कोठडी पुरवठ... डॉ. सुजय विखेंचा मेंदू खराब झाला’- रोहित पवारांचा बोचरा पलटवार उदयपूर ते शिर्डी सातवी पदयात्रा भक्तिभावात पूर्ण- साईभक्त मोहित आचार्य यांचे शिर्डीत आगमन गुटखा तस्करांवर एलसीबीची वक्रदृष्टी शिर्डीत एकाच रात्री तीन गुन्हे दाखल! दैनिक साईदर्शनच्या पाठपुराव... साई निर्माण ग्रुपच्या संकल्पपूर्ती तीर्थयात्रेचा भक्तिमय सोहळा- साई निर्माण ग्रुप व विजयराव कोते यां... पोटची मुलगी गमावली-अनाथ मुलीला घेतले दत्तक… अर्धी संपत्ती तिच्या नावे! अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वा...
अ.नगरराजकीय

विद्यमान खासदार नीलेश लंके यांचा माजी खासदार सुजय विखेंवर नावानिशी हल्लाबोल ‘डोनाल्ड ट्रम्पला स्वियसहाय्यक म्हणून घेऊन जा म्हणेन!’

अहिल्यानगर | प्रतिनिधी :
नगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. विद्यमान खासदार नीलेश लंके यांनी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर नावानिशी जोरदार टीका करत, नगर-मनमाड रस्ता आपल्या काळातच सुरू झाला आणि आपल्या काळातच पूर्ण होणार, असा दावा करणाऱ्यांवर थेट निशाणा साधला आहे.
सुजय विखे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना खासदार नीलेश लंके यांनी नगर-मनमाड रस्त्याचा आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा संदर्भ जोडणे हास्यास्पद असल्याचे म्हटले. “माध्यमातून त्यांचे वक्तव्य पाहिल्यानंतर मला लाजीरवाणी गोष्ट वाटली,” अशा शब्दांत लंके यांनी सुजय विखेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


‘डोनाल्ड ट्रम्पला स्वियसहाय्यक म्हणून घेऊन जा!’
खासदार लंके यांनी सुजय विखेंवर उपरोधिक टीका करताना, “मी डोनाल्ड ट्रम्पला रिक्वेस्ट टाकणार आहे की तुम्हाला स्वियसहाय्यक म्हणून जर कोणाला लागलं तर घेऊन जा,” असे खोचक वक्तव्य केले.
यामुळे नगर-मनमाड रस्त्याच्या प्रश्नावरून दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
‘तुम्ही आज कुठल्या पदावर नाही’
नगर-मनमाड रस्ता मीच पूर्ण करणार, असा दावा करणाऱ्यांवर लंके यांनी थेट निशाणा साधत, “आज तुम्ही कुठल्या पदावर नाही, ग्रामपंचायत सदस्यही नाही,” असे म्हणत सुजय विखेंना टोला लगावला.


“नगर-मनमाड रस्त्याचे काम माझ्याच काळात सुरू झाले आणि माझ्याच काळात संपणार,” असा दावा खासदार नीलेश लंके यांनी केला.
‘नवीन कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्यासाठी गडकरींची भेट’
रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अधिवेशनादरम्यान दोन-तीन वेळा भेट घेतल्याचे लंके यांनी सांगितले. संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्यासाठी प्रयत्न केले असून, नवीन निविदा काढून सक्षम कंत्राटदार नेमण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


“हा रस्ता खऱ्या अर्थाने मृत्यूचा सापळा झाला आहे. अनेक अडचणी आहेत; मात्र अडचणींवर मात करून काम पूर्ण करणे गरजेचे आहे. राजकीय भाष्य करण्यापेक्षा मला काम महत्त्वाचे आहे,” असे लंके म्हणाले.
‘दोनदा टेंडर काढले, एजन्सी नाठाळ निघाली’
खासदार झाल्यानंतर नगर-मनमाड रस्त्यासाठी दोन वेळा नवीन टेंडर काढण्यात आल्याचा दावा लंके यांनी केला. नवीन एजन्सी नियुक्त झाली; मात्र ती एजन्सीही अपेक्षेप्रमाणे काम करू शकली नाही. संबंधित एजन्सीने काही कामे उपकंत्राटदारांना दिली आणि त्यांच्याबाबतही चौकशी होणे गरजेचे असल्याचे लंके यांनी म्हटले.


काही उपकंत्राटदार राजकीय व्यक्तींच्या जवळचे असल्यामुळे त्यांनी कामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘गडकरींना फोटो, व्हिडिओ दाखवले’
नगर-मनमाड रस्त्याच्या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिली असून, कामाची छायाचित्रे आणि व्हिडिओदेखील दाखविल्याचे लंके यांनी सांगितले.
त्यानंतर संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. नवीन टेंडर काढून चांगला कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


‘दुसऱ्याला सांगायचं, आपण मात्र दूधखुळे?’
कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्याच्या मुद्द्यावरूनही लंके यांनी अप्रत्यक्षपणे सुजय विखेंवर निशाणा साधला. कामाची गुणवत्ता आणि वेळेत काम पूर्ण न होणे हे ब्लॅकलिस्ट करण्याचे महत्त्वाचे निकष आहेत, असे त्यांनी सांगितले.
“सगळं आपण करायचं आणि दुसऱ्याला सांगायचं—त्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं. दुनिया एवढी दूधखुळी राहिलेली नाही. कोणत्या कंत्राटदाराला त्रास दिला आणि कोणाच्या जवळच्या व्यक्तीला काम मिळवून दिले, हे जगाला माहिती आहे,” अशा शब्दांत लंके यांनी जोरदार टीका केली.


नगर-मनमाड रस्ता की राजकीय श्रेयवाद?
नगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्ता कधी पूर्ण होणार, हा प्रश्न सातत्याने उपस्थित होत असताना आता या कामावरून सुजय विखे विरुद्ध नीलेश लंके असा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे.
रस्ता कोणी सुरू केला आणि कोणी पूर्ण केला यापेक्षा नागरिकांसाठी तो प्रत्यक्षात कधी खुला होणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र या रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यावरून दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे सुरू झाले असून, खासदार नीलेश लंके यांच्या तिखट वक्तव्यामुळे या वादाला आता नवे वळण मिळाले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button